आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajrangi Bhaijaan Collected 284 Crore Rupees Worldwide

8 दिवसांत 300 कोंटीच्या जवळ पोहोचले 'बजरंगी भाईजान'चे कलेक्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सलमान खान आणि करीना कपूर खान स्टारर 'बजरंगा भाईजान' सिनेमाने भारतात बॉक्स ऑफिसवर 197.77 कोटींचा बिझनेस केला आहे. 17 जुलैला रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 184.64 कोटींचा व्यावसाय केला. तसेच दुस-या शुक्रवारी (24 जुलै) सिनेमाचे कलेक्शन 13.15 कोटींवर जाऊन पोहोचले. शनिवारी सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. याविषयी ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी टि्वटवर टि्वट करू माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, '#BajrangiBhaijaan continues its SUPREMACY. Will cross ₹ 200 cr nett today [Sat; Day 9]. Week 2: Fri 13.15 cr. Total: ₹ 197.77 cr. AMAZING!'
'पीके' आणि 'हॅपी न्यू इअर'ला टाकले मागे-
सिनेमाच्या कमाईने आमिर खानच्या 'पीके'ला पहिल्या आठवड्याचे कलेक्शन (183.09 कोटी) आणि शाहरुख खानच्या 'हॅपी न्यू ईअर'च्या पहिल्या आठवड्याच्या कलेक्शन (157.57 कोटी)ला मागे टाकले आहे. सोबतच, हा सलमानला तिसरा सर्वाधित कमाइ करणारा सिनेमा ठरला आहे. सलमानच्या सर्वाधिक कमाई करणा-या सिनेमांमध्ये 'किक' पहिल्या तर 'एक था टायगर' दुस-या क्रमांकावर आहे.
वर्ल्ड वाइड कमाई 300 कोटींच्या जवळ-
पहिल्या आठवड्यात परदेशात सिनेमाची कमाई 83.29 कोटी रुपये झाली. तरण आदर्श यांनी याविषयी टि्वट करू माहिती दिली. त्यांनी लिहिले, '#BajrangiBhaijaan Overseas Week 1: $ 13 million [₹ 83.29 cr]. FANTABULOUS!' भारतीय बॉक्स ऑफिस आणि परदेशातील कमाई मिळून सिनेमाची एकूण कमाई 281.06 कोटी रुपये झाली. शनिवारी (25 जुलै) वर्ल्डवाइड कलेक्शनच्या बाबतीत सिनेमाची कमाई 300 कोटींच्या पुढे जाऊ शकते.
सिनेमात बजरंगीबलीचा भक्त बनला सलमान-
सिनेमात सलमानने बजरंगबलीचा भक्त पवन कुमार चतुर्वेदी अर्थातच बजरंगीचे पात्र साकारले आहे. बजरंगी पाकिस्तानमधून भारतात हरवलेल्या मुन्नीला (हर्षाली मल्होत्रा) तिच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी उचलतो. नवाजुद्दीन सिद्दीकी यात त्याची मदत करतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कमाईविषयी तरण आदर्शने केलेले टि्वट...