आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'धूम 3\'चा विक्रम मोडित काढत \'बजरंगी..\' ठरला दूसरा Highest Grosser बॉलिवूड सिनेमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बजरंगी भाईजान'च्या एका सीनमध्ये सलमान खान आणि करीना कपूर खान)
मुंबई- दिग्दर्शक कबीर खानच्या 'बजरंगी भाईजान'ने कमाईच्या बाबतीत सर्व विक्रम मोडित काढले आहेत. सिनेमाने 16 दिवसांत 283.16 कोटींची नेट कमाई (ग्रॉस कलेक्शन 378.44 कोटी) केली. सोबतच सिनेमाने भारतातील बॉक्स ऑफिसवर आमिर खान स्टारर 'धूम 3' सिनेमाचासुध्दा विक्रम मोडित काढून सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. 'धूम 3'चे लाइफटाइम नेट कलेक्शन 280.25 कोटी (ग्रॉस कलेक्शन 372 कोटी रुपये) झाले. या यादीत आमिर खान स्टारर 'पीके' 339 कोटी रुपये नेट कमाई करून (ग्रॉस कलेक्शन 489 कोटी रुपये) पहिल्या स्थानावर आहे.
शनिवारी (1 ऑगस्ट) 6.80 कोटींची कमाई
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या सांगण्यानुसार, तिस-या शनिवारी 'बजरंगी भाईजान' सिनेमाची कमाई 6.80 कोटी इतकी झाली. त्यांना टि्वटरवर लिहिले, '#BajrangiBhaijaan [Week 3] Fri 4.11 cr, Sat 6.80 cr. Total: ₹ 283.16 cr. ALL TIME BLOCKBUSTER' हा आकडा भारतातील बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आहे.
वर्ल्डवाइड कलेक्शन 519.24 कोटी-
गुरुवारपर्यंत 'बजरंगी भाईजान'चे परदेशातील कलेक्शन 140.80 कोटी रुपये झाले होते. ही कमाई आणि भारतातील बॉक्स ऑफिसवरील कमाईचे कलेक्शन मिळून सिनेमाने आतापर्यंत वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर 519.24 कोटींची कमाई केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सिनेमाचे Day-By-Day कलेक्शन...