आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिसवर \'बजरंगी भाईजान\'ची धूम, 100 कोटींच्या क्लबमध्ये झाला सामील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सलमान खान स्टारर 'बजरंगी भाईजान'ने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. सिनेमाने सुरुवातीच्या दोन दिवसांत 63.75 कोटींचा व्यवसाय केला. आता सिनेमा रविवारपर्यंत 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी टि्वट करून सिनेमाच्या कमाईविषयी सांगितले. त्यांनी लिहिले, '#BajrangiBhaijaan sets BOX-OFFICE ON FIRE. Records MONSTROUS biz on Sun [Day 3]. Crosses ₹ 100 cr in opening weekend in India.'
सुरुवातीच्या तीन दिवसांच्या कमाईविषयी त्यांनी टि्वट करून सांगितले, '#BajrangiBhaijaan won hearts, acclaim... now emerges TRIUMPHANT at the BO. Fri 27.25 cr, Sat 36.60 cr, Sun 38.75 cr. Total: 102.60 cr.'
सलमानच्या 'बजंरगी...'ने चांगली कमाई केली आहे. तिसरे टि्वट करून तरण आदर्श यांनी सांगितले, की मागील आठवड्यात 'बाहुबली'ने तर या आठवड्यात 'बजरंगी भाईजान'ने चांगला बिझनेस केला आहे. तरण यांच्या सांगण्यानुसार, 'Film trade in an ECSTATIC mood. Last week,#Baahubali. Now, #BajrangiBhaijaan. Raining BLOCKBUSTERS. Achhe din aa gaye!'
टि्वटवरून स्पष्ट आहे, की सलमानच्या या सिनेमाने सुरुवातीच्या तीन दिवसांत 102.60 कोटींची कमाई केली. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा 17 जुलै रोजी रिलीज झाला. सिनेमात सलमान खान, करीना कपूर खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बालकलाकार हर्षाली मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.