आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवसांत 200 कोटींच्या जवळ पोहोचले 'बजरंगी भाईजान'चे कलेक्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बजरंगी भाईजान'च्या एका सीनमध्ये सलमान खान आणि हर्षाली मल्होत्रा)
मुंबई- सुपरस्टार सलमान खानचा नुकताच रिलीज झालेला 'बजरंगी भाईजान' सिनेमा केवळ चार दिवसांत जवळपास 200 कोटींच्या आसपास पोहोचला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शच्या सांगण्यानुसार, सोमवारी (20 जुलै)पर्यंत सिनेमाने भारताबाहेर 9.5 मिलियन अर्थातच 60 कोटींचा बिझनेस केला आहे. तसेच भरतात बॉक्स ऑफिसवर सिनेमाच्या कमाईचा आकडा 129.65 कोटींपर्यंत पोहोचला आहे. सिनेमाची एकूण कमाई जवळपास 190 कोटी झाली आहे.
कबीर खानच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा सिनेमा मागील शुक्रवारी (17 जुलै) रिलीज झाला. सिनेमाने पहिल्या दिवशी 27.25 कोटींची (भारतात) कमाई केली होती. शनिवारी (18 जुलै) सिनेमा 36.6 कोटींच्या घरात पोहोचला होता. तसेच रविवारी (19 जुलै) 38.75 कोटींपर्यंत सिनेमाची कमाई पोहोचली होती. तरण आदर्शच्या सांगण्यानुसार, सोमवारी (20 जुलै) सिनेमा कमाई 27.05 कोटी झाली.
नोट : सलमान खानशिवाय करीना कपूर खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि हर्षाली मल्होत्रासुध्दा सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तरण आदर्शचे टिवट्स...