आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Can\'t face Baahubali: सलमानच्या सिनेमाला साउथमध्ये मिळत नाहीयेत थिएटर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा शुक्रवारी थिएटरमध्ये दाखल होतोय. मात्र या सिनेमाच्या निर्मात्यांपुढे एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. दक्षिण भारतात या सिनेमाला पुरेसे थिएटर मिळत नाहीयेत. याचे कारण ठरला आहे बाहुबली हा सिनेमा. गेल्या शुक्रवारी राजामौली यांचा हा सिनेमा रिलीज झाला. भारतातला सर्वात महागडा सिनेमा ठरलेल्या 'बाहुबली'ने पाच दिवसांत कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली आहेत. त्यामुळे दक्षिणेतील सिनेमाघरांचे मालक आपल्या थिएटरमध्ये बाहुबली सिनेमाच चालवू इच्छितात. त्यामुळे बजरंगी भाईजानला दक्षिणेत थिएटर मिळेनाशे झाले आहेत.
पुढे वाचा, 'बाहुबली'च्या कमाईचे आकडे बघून सलमानच्या पोटात आला गोळा...