आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 'बजरंगी भाईजान'चे नवे गाणे 'भर दे झोली' झाले रिलीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सलमान खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'बजरंगी भाईजान' या सिनेमातील नवीन गाणे रिलीज करण्यात आले आहे. 'भर दो झोली मेरी या मोहम्मद' हे बोल असलेल्या गाण्याला अदनान सामीने स्वरसाज चढवला आहे. या गाण्याचे गीतकार कौसर मुनीर असून प्रीतम चक्रवर्ती संगीतकार आहेत.
यापूर्वी सिनेमातील 'सेल्फी ले ले रे' आणि 'तू चाहिए' ही दोन गाणी रिलीज झाली होती. शिवाय सिनेमाचा ट्रेलरसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात सलमान खान, करीना कपूर खान, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
सलमान खान फिल्म्स आणि रॉकलाइन वेंकटेश प्रॉडक्शनमध्ये तयार झालेला हा सिनेमा 17 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होतोय.