आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Bajrangi Bhaijaan' Team Leaves For Delhi, Spotted At Mumbai Airport

दिल्लीला रवाना झाली 'बजरंगी भाईजान'ची टीम, मुंबईत एअरपोर्टवर स्पॉट झाले स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमान खान, डायरेक्टर कबीर खान, करीना कपूर खान)
मुंबईः आगामी 'बजरंगी भाईजान' या सिनेमाची संपूर्ण टीम मंगळवारी सकाळी मुंबई विमानतळावर दिसली. सलमान खान, करीना कपूर खान, दिग्दर्शक कबीर खानसह सिनेमाचे सर्व स्टार्स प्रमोशनसाठी दिल्लीला रवाना झाली.
एअरपोर्टवर सलमान चेक शर्ट आणि ब्लू डेनिम्समध्ये दिसले. करीना कपूर खान यलो टीशर्ट, ग्रीन जॅकेट आणि डेनिम्समध्ये दिसली. तर दिग्दर्शक कबीर ब्लू आउटफिटमध्ये स्पॉट ढाले. याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि गायक अदनान सामी पत्नी रोया फर्याबीसोबत एअरपोर्टवर दिसले.
सलमान सध्या 'बजरंगी भाईजान'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सोमवारीच त्याने आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससाठी सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. स्क्रिनिंगला त्याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी हिनेही हजेरी लावली होती.
कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा येत्या 17 जुलै रोजी रिलीज होणार आहे. सिनेमात सलमान आणि करीनासह नवाजुद्दीन सिद्दीकी आणि हर्षाली मल्होत्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बजरंगी भाईजान'च्या प्रमोशनसाठी दिल्लीला रवाना झालेल्या स्टार्सची काही छायाचित्रे...