आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल झाला 'बजरंगी भाईजान'चा टीजर, 48 तासांत मिळाले 18 लाख हिट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सलमान खानच्या बहुप्रतिक्षित 'बजरंगी भाईजान' या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. सलमान खान आणि करीना कपूर स्टारर या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय. 1.32 मिनिटांचा हा टीजर इंट्रेस्टिंग आहे.
टीजरला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. टीजरला 20 तासांत 9.6 लाख तर 48 तासांत 18 लाख हिट्स मिळाले आहेत.
टीजरमध्ये सलमान खान बजरंगबली हनुमानाच्या भक्ताच्या रुपात दिसतोय. करीना कपूर खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांचीही झलक टीजरमध्ये बघायला मिळतेय. एक चिमुकली मुलगी सीमापार करुन दुस-या देशात दाखल होते आणि तिला परत आपल्या देशांत नेण्याचा संघर्ष करताना सलमान टीजरमध्ये दिसतोय.
चाहते सलमान खानच्या या सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत. सोशल साइट्सवर गेल्या आठवड्याभरापासून 'बजरंगी भाईजान' ट्रेंड करतोय. शाहरुख खान आणि आमिर खानने आपापल्या सोशल साइट्स अकाउंटवर सिनेमाचा फस्ट लूक शेअर केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बजरंगी भाईजान'च्या टीजरची झलक...