आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bajrangi Bhaijaan, The Latest In A Series Of Salman Films Timed To Release On Eid

सलमानची आयडियाची कल्पना : गॅलेक्सीच्या कंपाऊंड वॉलला लावले काच, जाणून घ्या कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमानच्या गॅलेक्सीच्या कंपाऊंड वॉलला लावण्यात आलेले काच, इनसेटमध्ये सलमान खान)
मुंबईः अभिनेता सलमान खानने मुंबईतील आपल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या कंपाऊंड वॉलला काच लावून घेतले आहेत. त्याचे कारण म्हणजे त्याच्या चाहत्यांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या. सविस्तर वृत्त असं, की सलमानची एक झलक बघण्यासाठी दररोज असंख्य चाहते त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर जमत असतात.
सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावर राहतो, तेथून बालकनीतून तो आपल्या चाहत्यांचे अभिवादन स्वीकारत असतो. काही जण त्याची झलक जवळून बघण्यासाठी चक्क गॅलेक्सी अपार्टमेंटच्या भिंतींवर चढतात. त्यावरुन पडून चाहत्यांना इजा होण्याची शक्यता असते. चाहतेच नव्हे तर अनेक फोटोग्राफर्ससुद्धा त्याची एक झलक कॅमे-यात कैद करण्यासाठी भिंतींवर चढतात.
या सर्वावर तोडगा म्हणून सलमानने गॅलेक्सीच्या कंपाऊंड वॉलला काच आणि लोखंडाचे कडे बसवून घेतले आहेत.
आता सलमानचा बहुप्रतिक्षित 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे साहजिकच पुन्हा एकदा चाहते त्याच्या घराभोवती गरडा घालतील, हे नक्की. त्यावर सलमानने ही आयडियाची कल्पना शोधून काढली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, गॅलेक्सी अपार्टमेंटच्या कंपाऊंड वॉलची छायाचित्रे...