(अर्पिता फार्म)
मुंबईः अभिनेता सलमान खानचे पनवेल स्थित फार्म हाऊस पार्टी आणि इतर सोशल इव्हेंट्समुळे नेहमीच चर्चेत असते. आता या फार्म हाऊसची झलक प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार असल्याची बातमी आहे. हा सिनेमा म्हणजे कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान' आहे. या सिनेमात सलमान स्वतः मुख्य भूमिकेत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कबीर खान यांनी सिनेमातील काही सीन्स या फार्म हाऊसमध्ये चित्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सिनेमातील शेवटच्या दृश्यांसाठी कबीर खान लोकेशनच्या शोधात होते. तेव्हा सलमानने त्यांना आपल्या फार्म हाऊसची ऑफर दिली. जेणेकरुन निर्मिती खर्च कमी होईल. त्यानंतर कबीर खान यांनी या फार्म हाऊसची पहाणी केली. सिनेमातील दृश्यांसाठी त्यांना हे लोकेशन अगदी परफेक्ट वाटले आणि त्यांनी येथे चित्रीकरण करण्यास होकार दिला. सलमान खान आणि करीना कपूर खान यांच्यावर येथे सिनेमातील शेवटची भाग चित्रीत होणार आहे.
'बजरंगी भाईजान' या सिनेमात सलमान आणि करीनासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वपूर्म भूमिकेत आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणारेय.
सलमानच्या फार्म हाऊसला अर्पिताचे नाव
पनवेल (नवी मुंबई) स्थित सलमानचे हे फार्म हाऊस त्याची धाकटी बहीण अर्पिताच्या नावावर आहे. अर्पिताचा अर्थ देवाच्या कृपेने मिळालेले. सलमानच्या मते, जेव्हापासून अर्पिता त्यांच्या आयुष्यात आली, तेव्हापासून देवाने त्यांना भरभरुन दिले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सलमानच्या अर्पिता फार्म हाऊसची निवडक छायाचित्रे...