आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या \'बजरंगी भाईजान\'ला पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः 'बजरंगी भाईजान'च्या एका सीनमध्ये सलमान खान)
कराचीः अभिनेता सलमान खानचा आगामी 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा पाकिस्तानात पूर्ण दाखवला जाणार नाहीये. त्याचे कारण म्हणजे या सिनेमाच्या काही दृश्यांवर पाकिस्ताच्या सेंट्रल सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. काही दृश्ये वगळल्यानंतर हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान संबंधांवर बनलेला हा पहिलाच सिनेमा आहे, ज्याला पाकिस्तानात रिलीज करण्याची परवानगी मिळाली आहे. ईदच्या मुहूर्तावर अर्थातच 17 जुलै रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
पाकिस्तानच्या सेंट्रल बोर्ड ऑफ सेन्सॉरचे अध्यक्ष मुबाशिर हसन यांनी सांगितले, ''बजरंगी भाईजानमधील काही दृश्य वगळ्यानंतर त्याला ईदला रिलीज करण्याची परवानगी देण्यात आली आहे.''
सिनेमाची कहाणी...
'बजरंगी भाईजान' अशा एका व्यक्तीची कहाणी आहे, जो हनुमानाचा भक्त आहे आणि पाकिस्तानातून चुकीने भारतात दाखल झालेल्या एका चिमुकलीला तिच्या घरी अर्थातच पाकिस्तानात नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो.
... मात्र पाकिस्तानातील पंजाबमध्ये रिलीजवर अद्यापही बंदी
बातमी आहे, की लाहोर सेन्सॉर बोर्डाने पाकिस्तानातील पंजाब सूबेमध्ये 'बजरंगी भाईजान'च्या रिलीजला अद्याप परवानगी दिलेली नाही.
पाकिस्तानात ईदच्या मुहूर्तावर सिनेमा रिलीज करत असल्याने अनेक दिग्गज नाराज
पाकिस्तानातील फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत काही लोकांच्या मते, 'बजरंगी भाईजान' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात यावी. कारण ईदच्या मुहूर्तावर येथेही बरेच मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत. 'रॉन्ग नो' आणि 'बिन रोए' हे दोन मोठे सिनेमे पाकिस्तानात ईदला रिलीज होणार आहेत. या सिनेमांना 'बजरंगी भाईजान'ची मोठी स्पर्धा मिळू शकते. 'बिन रोए' या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा मुख्य भूमिकेत असून ती लवकरच शाहरुख खानसोबत 'रईस' या बॉलिवूड सिनेमात झळकणार आहे.
यापूर्वीही अनेक सिनेमांवर पाकिस्तानात रिलीजला होती बंदी
भारत-पाकिस्तान संबंधांवर आधारित अनेक सिनेमे यापूर्वीही बॉलिवूडमध्ये तयार झाले आहेत. त्यापैकी अनेक सिनेमांच्या रिलीजवर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली होती. यामध्ये 'एक था टाइगर', 'एजेंट विनोद', 'हैदर', 'बेबी' आणि 'तेरे बिन लादेन' या सिनेमांचा समावेश आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सिनेमातील काही निवडक दृश्ये..