आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Banbeef Controversy: Fans Lashes On Rishi Kapoor\'s Tweet

गोमांस खाणा-या ऋषी कपूरवर भडकले चाहते, टि्वटरवर केली शिवीगाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- ऋषी कपूर, खाली चाहत्यांचे Tweet)
मुंबई- अभिनेते ऋषी कपूर यांनी अलीकडेच गो हत्या आणि गोमांसवर एक वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांना लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागला.
अलीकडेच गो हत्या आणि गोमांसवर बंदी घालण्यात आल्यानंतर ऋषी कपूर यांनी या कायद्याचा विरोध केला होता. त्यांनी टि्वट करून लिहिले, 'मी नाराज आहे. कोण काय खातोय याच्याशी त्याला त्याच्या धर्माशी का जोडले जाते. मी हिंदू आणि बीफ खातो. असे केल्या मी धार्मिक नाहीये का?'
ऋषी कपूर यांच्या सांगण्यानुसार, देशात कुणाच्या खाण्या-पिण्यावर बंदी नसावी. ऋषी यांनी पुढील टि्वटमध्ये लिहिले, की त्यांच्याना डुकराच्या मांसचे पदार्थसुध्दा आवडतात.
मात्र ऋषी कपूर यांचे चाहते त्यांच्या अशा टि्वटने नाराज झाले आहेत. त्यांना ऋषी कपूर गोमांस खातात माहित झाले आणि ही बातमी सोशल मीडियवर व्हायरल झाली. त्यानंतर काही लोकांनी सोशल मीडियावर शिवीगाळसुध्दा केली. चाहत्यांनी त्यांना अभद्र भाषेत रि-टि्वटसुध्दा केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा चाहत्यांनी ऋषी कपूर यांना केलेले Tweets...