आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Now an August release: 'बंगिस्तान'ची रिलीज डेट पुढे ढकलली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवोदित दिग्दर्शक करण अंशुमचा धर्मावर व्यंग करणारा कॉमेडी सिनेमा 'बंगिस्तान'च्या ट्रेलरने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एक दिवसापूर्वीच या सिनेमातील रॅप गाणे रिलीज झाले असून यामध्ये रितेश देशमुख ओसामा बिन लादेनच्या तर पुलकित सम्राट सद्दाम हुसैनच्या गेटअपमध्ये दिसत आहेत.
हा सिनेमा या महिन्यात 31 जुलै रोजी रिलीज होणार होता. मात्र आता आठवड्याभरासाठी या सिनेमाचे रिलीज रद्द करण्यात आले आहे. याचे कारण ठरला आहे अजय देवगण स्टारर 'दृश्यम' हा सिनेमा. 31 जुलै रोजी अजयचा 'दृश्यम' थिएटरमध्ये दाखल होतोय. त्यामुळे बंगिस्तानला फारच कमी स्क्रिन मिळत होत्या.
दुसरे कारण म्हणजे अलीकडेच रिलीज झालेले 'बाहुबली' आणि 'बजरंगी भाईजान' हे सिनेमे थिएटरमध्ये सुरु आहे. बाहुबलीचा तिसरा तर बजरंगी भाईजानचा दुसरा आठवडा सुरु आहे. त्यामुळे पुढील आणखी एक आठवडा या सिनेमांचा दबदबा राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अजयच्या सिनेमाला पुरेसे स्क्रिन मिळाले आहेत. त्यामुळेच 'बंगिस्तान'ची रिलीज डेट पुढे ढकलणेच निर्मात्यांना योग्य वाटले.
फरहान अख्तरच्या एक्सेल एन्टरटेन्मेंट या निर्मिती संस्थेने आता हा सिनेमा 7 ऑगस्ट रोजी रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. रितेश देशमुखनेसुद्धा 7 ऑगस्टला सिनेमा रिलीज होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.