आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेशने आणला प्रमोशनचा नवा फंडा, दंगल आणि युट्युबचे शेअर केले फनी पोस्टर..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन मुंबई - अभिनेता रितेश देशमुखचा आगामी चित्रपट 'बँक चोर' 16 जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या कॉमेडी चित्रपटात रितेश देशमुखसोबत विवेक ओबेरॉयही झळकणार आहे. 'धूम' चित्रपटाचा हा फनी वर्जन असणार आहे. नुकतेच रितेशने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नवीन युक्ती लढविली आहे. त्याने सोशल मीडियावर काही हिट चित्रपटांचे पोस्टर वापरुन त्यात स्वतःचे फोटो टाकले आहेत. 
 
रितेशने हे फोटो शेअर करत After #Dangal's stupendous success in China - Next film to release there is #BankChor - This is our poster for the China release असे कॅप्शन दिले आहे. 
 
कॉमेडी चित्रपट असल्याने रितेशने त्याच अंदाजात त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. दंगल शिवाय त्याने 'ट्युबलाईट', 'बेगम जान', 'डार्क नाईट' यांसारख्या चित्रपटांचे पोस्टर वापरले आहेत. 'बँक चोर' चित्रपट येत्या 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. हा असा पहिला भारतीय चित्रपट आहे जो 16D मध्ये रिलीज होणार आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, रितेशने शेअर केलेले 4 फनी फोटोज्....
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...