आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: जेव्हा एका पूजा-याने केला होता दावा, \'जॉन अब्राहमसोबत झालेय जेनेलियाचे लग्न\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेनेलिया डिसूजा, उजवीकडे जॉन अब्राहमसोबत - Divya Marathi
जेनेलिया डिसूजा, उजवीकडे जॉन अब्राहमसोबत
मुंबई: रितेश देशमुखची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा 29 वर्षांची झाली आहे. 5 ऑगस्ट 1987ला जन्मलेल्या जेनेलियाविषयी क्वचितच लोकांना ठाऊक आहे, की एकदा साऊथमध्ये तिच्या सिनेमांवर बंदी घालण्याची घोषणा झाली होती. तसेच एका पूजा-याने तिचे आणि जॉन अब्राहमचे लग्न झाल्याचासुध्दा दावा केला होता.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जेनेलियाच्या आयुष्याविषयी असेच रंजक किस्से सांगत आहोत.
साऊथमध्ये जेनेलियाच्या सिनेमे का केले होते बॅन...
2009मध्ये श्रीलंका आर्मी आणि लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलमच्या (LTTE) युद्धात तामिळ नागरिक मारले गेले होते. त्याच्या विरोधात अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य कलाकारांनी कोलंबोमध्ये (श्रीलंका, 2010) झालेल्या आयफा इव्हेंटला बायकॉट केले होते. परंतु कथितरित्या जेनेलिया आपल्या बॉयफ्रेंड (आता पती) रितेश देशमुखसोबत तिथे दिसली होती. त्यामुळे नाराज झालेल्या तामिळ ग्रुप्सने जेनेलियाच्या सिनेमांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
जेव्हा जॉनसोबत लग्न झाल्याच्या बातम्या आल्या समोर...
जेनेलियाने 2012मध्ये रितेश देशमुखसोबत लग्न केले. परंतु त्यापूर्वी तिच्या आयुष्यात एक मोठे वादळ आले होते. एका पूजा-याने दावा केला होता, की 'फोर्स'च्या सेटवर जेनेलिया आणि जॉन अब्राहमचे खरोखर लग्न झाले होते. हे लग्न त्याने स्वत: लावले होते. 'फोर्स' सिनेमात जॉन आणि जेनेलियामध्ये एक लग्नाचा सीन शूट करण्यात आला होता. याचे शूटिंग एका मंदिरात झाले होते. त्यासाठी एका पूजा-याला बोलावण्यात आले होते. जेव्हा त्या पूजा-याला रितेश-जेनेलियाच्या लग्नाचे प्लान माहित झाला तेव्हा त्याने सांगितले होते, की सिनेमाच्या सेटवर नकळत पण खरे मंत्र म्हटले होते. त्यामुळे जेनेलिया विवाहित असून पुन्हा लग्न करू शकत नाही. नंतर स्पष्ट झाले होते, की हा केवळ पब्लिसिटी स्टंट होता.
जीनू आहे जेनेलियाचे निकनेम...
क्वचितच लोकांना ठाऊक आहे, की जेनेलियाचे निकनेम जीनू आहे. एका मुलाखतीत जेनेलियाने सांगितले होते, की तिचे नाव तिच्या आई-वडिलांचे नाव मिळून बनलेले आहे. जेनेलियाच्या आईचे नाव जेनेट आणि वडिलांचे नील डिसूजा आहे. रिपोर्ट्सनुसार, जेनेलियाने वयाच्या 15व्या वर्षीपासून मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली होती. अभिनय आणि मॉडेलिंगशिवाय ती अॅथलीट आणि नॅशनल लेव्हलची फुटबॉल खेळाडू आहे. 2003मध्ये तिने 'तुझे मेरी कसम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर तिने अनेक दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेमांत काम केले.
रितेश-जेनेलियाची लव्हस्टोरी...
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाची पहिली भेट हैदराबादमध्ये 'तुझे मेरी कसम' सिनेमाच्या टेस्ट शूटदरम्यान झाली होती. दोघे एकमेकांचे को-स्टार होते. जेनेलिया जेव्हा पहिल्यांदा रितेशला एअरपोर्टवर भेटली तेव्हा त्याला इग्नोर करत होती. कारण ती तिच्या आईसोबत होती.
रितेशचे वडील विलेसराव देशमुख महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री होते. म्हणून तिला वाटले, की रितेशसुध्दा वडिलांप्रमाणे नेताच होईल. परंतु जेव्हा ती त्याला भेटली आणि कुटुंबीयांप्रती त्याचे प्रेम पाहून भारावली. शूटिंगनंतर रितेशने अनेद दिवस जेनेलियाला मिस केले. नंतर दोघांचे फोनवर बोलने व्हायला लागले. दोघे रात्री कॉफी शॉपवर भेटत आणि तासन् तास गप्पा मारत होते. हळू-हळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघे जवळपास 10 वर्षे डेटींग करत होते. दोघांपैकी कुणी आधी प्रपोज केले होते, हे त्या दोघांनासुध्दा लक्षात नाहीये. 2012मध्ये रितेश आणि जेनेलिया लग्नगाठीत अडकले. रितेश सांगतो, की त्याला जेनेलियाची प्रत्येक गोष्ट आठवणीत राहण्याची सवय बेकार वाटते. तिला प्रत्येक गोष्ट आठवणीत राहते. रितेशचे नेहमी बिझी राहते, जेनेलियाला आवडत नाही. ती सांगतो, की रितेश स्वत:ला प्रत्येकवेळी बिझी दाखवण्याचा प्रयत्न करतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जेनेलियाचे न पाहिलेले PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...