Home »News» Begum Jaan Haweli On Location Photos

9 हजार स्क्वेअर फूट भव्य महालात झाले 'बेगम जान' चे शूटिंग, पाहा Location चे Photos

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 14:49 PM IST

मुंबई - विद्या बालनचा बेगम जान रिलीज झाला आहे. चित्रपटाची कथा एका वेश्यालयावर आहे जो भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान बॉर्डरच्या मधोमध असतो. या हवेलीची म्हणजेच वेश्यालयाची मालकिण असते विद्या बालन म्हणजेच चित्रपटातील बेगम जान. चित्रपटातील दमदार अभिनयामुळे विद्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग एका हवेलीत झाले आहे जी तब्ब्ल 9 हजार स्क्वेअर मीटरवर पसरली आहे. dainikbhaskar.com च्या टीमने जेव्हा याबाबत अधिक माहिती घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी हवेलीचे डिजायनर शाश्वती कर्माकर आणि मृदूल वैद्य यांच्यासोबत संवाद साधला तेव्हा त्यांनी उलगडले, कशी त्यांनी बनविली 9 हजार स्क्वेअर फूटमध्ये 7 खोल्यांची हवेली. 
 
शाश्वती सांगते की, चित्रपटात जी हवेली दाखविण्यात आली आहे त्याला 7 खोल्या, एक मोठा टेरेस आणि अंगणही होते. हवेलीचे पाच खोल्या शूटिंगसाठी वापरण्यात आल्या होत्या बाकि दोन खोल्यांमध्ये शूटींगचे सामान ठेवले होते. ही हवेली बनविण्यासाठी 45 दिवसाचा अवधी लागला. ओपन एरिया असल्याने तिथे फार वारा होता त्यामुळे दोन वेळा ही हवेली पडली. ज्यामुळे पून्हा दोन वेळा हवेली बनविण्यासाठी वेळ लागला. 
 
कोलकात्याहून विकत घेतला होता विद्यासाठी हुक्का

शाश्वतीने सांगितले की, दिल्लीहून खास फुलकारी बेडशीट्स विकत आणली गेली होती आणि चित्रपटात सर्वांचा आकर्णणाचा केंद्रबिंदू असलेला विद्या बालनचा हुक्का कोलकातामधून घेतला होता. हवेली सजविण्यासाठी राजस्थान, कोलकाता, चेन्नई आणि दिल्लीच्या बाजारामध्ये फिरताना फार मेहनत घ्यावी लागली. हवेलीला 1947 च्या वेळीचा लुक देण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत होती. चित्रपटाच्या शूटिंगसाठी श्रीजीत मुखर्जी यांनी झारखंडचा आउटर एरिआ सिलेक्ट केला होता. झारखंडच्या या परिसरात वाळवंट आणि पहाडे होती त्यामुळे या बॉर्डरला अॅक्चुअल एरियाचा लुक आला. 
 
शेवटी आगीच्या हवाल्यात केली हवेली..

चित्रपटातील एका सीनमध्ये हवेलीला आग लागते. त्यासाठी आम्ही हा सीन खरा वाटावा यासाठी पूर्ण हवेली जाळून टाकली. येथे राहणाऱ्या लोकांना हे अजिबात आवडले नाही. त्यांच्यासाठी ती हवेली एखाद्या नॅशनल हेरीटेजप्रमाणे झाली होती. ज्या दिवशी हवेली जाळण्याचा सीन होता तिथे खूप पब्लिक जमा झाली. आता जर तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला जाणवणारही नाही ती इथे बेगम जानची हवेली होती. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, बेगम जानच्या हवेलीचे खास फोटोज्..

Next Article

Recommended