आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बेगम जान\'चा ट्रेलर रिलीज, विद्या बालनचा दिसला पॉवरफुल अवतार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अभिनेत्री विद्या बालनच्या आगामी ‘बेगम जान’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सोशल मीडियातून ट्रेलरचं कौतुक केलं जातंय. या सिनेमात विद्याने एका कोठ्याच्या मालकिणीची भूमिका वठवली आहे. ‘बेगम जान’ या सिनेमाची कथा ही भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवरील आहे. फाळणी झाल्यानंतर या महिलांचा कोठा हा अर्धा भारतात तर अर्धा पाकिस्तानात वाटला जातो. मात्र, बेगम जान तिचं घर सोडायला तयार नसते. ती तिच्या कोठ्यातील मुलींसोबत मोठा लढा उभारते. आता तिला तिचं हे घर मिळणार का? हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
 
या सिनेमात विद्या एक देहव्यवसाय करणारी महिला दाखवण्यात आली आहे. त्यामुळे विद्याचा हे एक वेगळं रूपही आता बघायला मिळणार आहे. या सिनेमाची निर्मिती मुकेश भट, विशेष भट आणि प्ले एन्टरटेन्मेंट यांनी केली असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीजित सिंग यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
 
या सिनेमात विद्या बालन ही मुख्य भूमिकेत असून सोबतच नसीरूद्दीन शहा, इला अरूण, गौहर खान, पल्लवी शारदा, रजीत कपूर, आशिष विद्यार्थी, विवेक मुशरान, चंकी पांडे, पूनम सिंग राजपूत, रिद्धीमा तिवारी, फ्लोरा सायनी, प्रियांका सेठीया, मिष्टी चक्रवर्ती यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
 
या सिनेमाचा आहे रिमेक
'बेगम जान' हा सिनेमा श्रीजीत मुखर्जींचा बंगाली सिनेमा 'राजकाहिनी'चा हिंदी रिमेक आहे. बंगाली सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. श्रीजीत मुखर्जी दिग्दर्शित 'बेगम जान' येत्या 14 एप्रिल रोजी रिलीज होणारेय.
 
शेवटच्या स्लाईडवर बघा, 'बेगम जान'चा लक्ष वेधून घेणारा ट्रेलर...
बातम्या आणखी आहेत...