आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : असे झाले सलमानच्या 'बजरंगी भाईजान'चे शूटिंग, पाहा मेकिंगची झलक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: सलमान खानच्या आगामी 'बजरंगी भाईजान' या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. सिनेमाचा पहिला ट्रेलर चांगलाच हिट ठरलाय आणि त्यानंतर आलेले 'सेल्फी ले ले रे' हे गाणेही चांगलेच गाजत आहे.
आता ट्रेलरच्या मेकिंगचा व्हिडिओ रिलीज करण्यात आलाय. 1.40 मिनिटांच्या या व्हिडिओत सिनेमाचे बिहाइंड द सीन्स दाखवण्यात आले आहेत. यापैकी अनेक सीन्सची झलक आपल्याला टीजरमध्ये बघायला मिळाली आहे. व्हिडिओत सेल्फी ले ले रे गाणे, काश्मीर, सलमान-करीनाची सायलिंगसह अनेक सीन्स बघायला मिळत आहेत. एका सीनमध्ये दिग्दर्शक कबीर खान चित्रपटात काम केलेल्या लहान मुलीला सीन समजावतांना दिसतायेत.
कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा सलमान खान फिल्म्स या बॅनरमध्ये तयार झाला आहे. सलमानसह या सिनेमात करीना कपूर खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि हर्षाली मल्होत्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर सिनेमा रिलीज होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सिनेमाच्या ऑन लोकेशनची छायाचित्रे...