आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 वर्षीय बंगाली अभिनेत्रीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः दिशा गांगुली)
कोलकाता: बंगाली मालिकेमध्ये छोट्या पडद्यावर झळकणारी अभिनेत्री दिशा गांगुली हिचा दक्षिण कोलकातामध्ये राहत्या घरी गळफास लावून घेतलेला मृतदेह सापडला आहे. दिशाने आत्महत्या केली असण्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दिशा 23 वर्षांची होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “दिशा आपल्या बेडरुमधील पंख्याला गळफास घेऊन लटकलेली आढळून आली. स्वत:च्या ओढणीने तिने गळफास लावून घेतला आहे. तसेच बेडरुमचा दरवाजाही आतून बंद करुन घेण्यात आला होता. तिच्या एका मित्राने दरवाजा तोडून तिचा मृतदेह खाली उतरविला.”
या प्रकरणी सध्यातरी कोणावरही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. तसेच कोणाविरोधातही तक्रारही दाखल करण्यात आलेली नाही.
रिपोर्ट्सनुसार, बुधवारी रात्री दिशा तिचा अभिनेता असलेल्या मित्रासोबत कोलकाताच्या ईडन गार्डनवर आयपीएलचा सामना बघायला गेली होती. सामना संपल्यानंतर ती मित्राच्या घरी गेली होती. तेथे मित्राच्या आईसोबत तिची भेट झाली. गेल्या काही दिवसांपासून दिशा या मित्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. या दोघांची लग्न करण्याची इच्छा होती. बुधवारी रात्री दिशाने आपल्या या मित्राला फोन करुन मी तुझ्या आईला पसंत पडले का ? असा प्रश्न विचारला. त्यावर मी आईशी बोलू शकलो नाही, असे उत्तर तिला तिच्या मित्राने दिले.
गुरुवारी सकाळी दिशा तिच्या या मित्राचा फोन उचलत नव्हती. त्यामुळे सकाळी 11.50 वाजता दिशाचा मित्र तिच्या पणश्री या राहत्या घरी गेला. दिशा दार उघडत नसल्याचे बघून दार तोडण्यात आले. त्यावेळी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिशाचा मृतदेह आढळून आला.
दिशाने ‘कनकांजली’ या लोकप्रिय बंगाली मालिकेत काम केले होते. शिवाय अनेक वाहिन्यांवरील शोजमध्येही तिने काम केले होते.
दिशाच्या फेसबुक प्रोफाईलनुसार, तिचा जन्म आणि शालेय शिक्षण हे तांझानिया येथे झाले होते. तिचे आईवडील तांझानियात वास्तव्याला आहेत. शिक्षण संपल्यानंतर दिशा कोलकाता येथे स्थायिक झाली होती. तिने येथील भवानीपुर एज्युकेशन सोसायटी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. शिक्षण संपल्यानंतर तिने बंगाली टीव्ही मालिकांमध्ये काम सुरु केले होते.
पुढे पाहा, दिशा गांगुलीची निवड छायाचित्रे...