आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

58व्या वर्षी या अॅक्ट्रेसचा झाला मृत्यू, दोन महिन्यांपूर्वी झाले होते कँसरचे निदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगाली फिल्म अॅक्ट्रेस रीता कोईराला यांचे कँसरमुळे निधन. - Divya Marathi
बंगाली फिल्म अॅक्ट्रेस रीता कोईराला यांचे कँसरमुळे निधन.

मुंबई - बंगाली चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री रीता कोईराला (58) यांचे रविवारी निधन झाले. त्या बऱ्याच दिवसांपासून कँसरने पीडित होत्या. त्यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांना लिव्हर कँसर असल्याचे निदान झाले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे. 


फिल्म आणि टीव्ही सीरियलमध्ये करायच्या काम 
रीता यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यांनी रितुपर्णा घोष दिग्दर्शित असुख (1999), अपर्णा सेनची फिल्म  'पारोमितार एक दिन' (2008), अंजना दत्त यांची  'दत्त व्हर्सेस दत्त' (2012) मध्ये काम केले होते. रीता कोईराला सध्या  टीव्ही शो 'राखी बंधन' आणि 'स्त्री' मध्ये काम करत होत्या. 

 

दोन महिन्यांपूर्वीच त्यांना कँसर असल्याचे निदान झाले होते, त्यानंतरही त्या टीव्ही शोमध्ये काम करत होत्या. आठवड्याभरापूर्वी त्यांची किमोथेरपी झाली होती, आणि त्यानंतर त्या घरी गेल्या होत्या. रविवारी सकाळी अचानक त्यांची तब्ब्यत बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आले. तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. 


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

 

पुढील स्लाइडमध्ये, पाहा, रीता कोईराला यांचे 3 फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...