आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 डायलॉग्सने घराघरांत झाले फेमस, जर्नलिस्टचा मुलगा असा बनला फिल्म स्टार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटना- विनोदवीर आणि बॉलिवूड अभिनेते संजय मिश्रांचा आज वाढदिवस आहे. 6 ऑक्टोबर 1969 मध्ये बिहारच्या दरभंगा येथे त्यांचा जन्म झाला. टीव्ही इंडस्ट्रीतून आपल्या करिअरची सुरुवात करणारे संजय आपल्या खास संवादांमुळे घराघरांत प्रसिद्ध झाले आहेत. इंडस्ट्रीत एवढी प्रसिद्धी मिळाल्यानंतरसुद्धा त्यांचा जुना अंदाज मुळीच बदलला नसल्याचे, त्यांचे मित्र सांगतात. आजही ते बनारसी आणि बिहारी थाटात दिसतात. बिहारमध्ये जन्मलेल्या संजयचे काय आहे बनारसी कनेक्शन...
- संजय यांचा जन्म बिहारमध्ये झाला. मात्र त्यांचे शिक्षण वाराणसीतील केंद्रीय विद्यालय बिएचयूमध्ये झाले.
- बीएचयूमधून बॅचलर डिग्री प्राप्त केल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून 1989 मध्ये अभिनयाचे धडे गिरवले.
- संजय यांचे वडील शंभुनाथ मिश्रा पत्रकार होते तर आई गृहिणी होत्या.
- किरण मिश्रा हे संजय यांच्या पत्नीचे नाव असून त्यांना दोन मुले आहेत. पल मिश्रा हे मुलाचे तर लम्हा मिश्रा हे त्यांच्या मुलीचे नाव आहे.

असे सुरु झाले संजय मिश्रांचे करिअर...
- शिक्षण पुर्ण झाल्यानंतर संजय मुंबईत दाखल झाले आणि 1991मध्ये 'चाणक्य' या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली.
- एका मुलाखतीत संजय यांनी सांगितले होते, की एनएसडीतून अभिनयाचे धडे गिरवल्यानंतरसुद्धा पहिल्यांदा कॅमे-यासमोर येणे त्यांच्यासाठी खूप अवघड गेले होते. पहिल्या सीनसाठी त्यांनी 28 वेळा रिटेक दिले होते.
- 'ओह डार्लिंग! ये है इंडिया!' या सिनेमातून संजय मिश्रांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली. या सिनेमात त्यांनी हार्मोनियम प्लेअरची छोटेखानी भूमिका साकारली होती.
- ऑफिस ऑफिस या टीव्ही मालिकेतील शुक्ला जी हे त्यांनी साकारलेले पात्र खूप गाजले.
- आँखो देखी या सिनेमासाठी त्यांना फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या (क्रिटिक) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा संजय मिश्रांचे बेस्ट डायलॉग्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी
बातम्या आणखी आहेत...