आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos मध्ये बघा 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील Best Moments

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते बुधवारी विज्ञान भवनात शानदार कार्यक्रमात करण्यात आले. ‘कासव’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘दशक्रिया’या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘सायकल’, ‘व्हेंटिलेटर’, ‘आबा ऐकताय ना ?’ या मराठी चित्रपटाला विविध श्रेणीत पुरस्कार प्राप्त झाले असून मराठी मोहर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ठळक दिसून आली. दरवर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यावर्षी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सुरभी सी.एम. यांना ‘मिन्नामिनुनगू द फायरफ्लाय’ या मल्याळम चित्रपटासाठी तसेच सर्वोत्कष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अक्षय कुमारला ‘रुस्तम’ या हिंदी चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला.  

अक्षय कुमारला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार
26 वर्षांच्या कारकिर्दीत अभिनेता अक्षय कुमाराला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारने गौरवण्यात आलं आहे. 'रुस्तम' सिनेमातील अक्षयच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यात अक्षय पत्नी ट्विंकल आणि मुलगा आरवसोबत सहभागी झाला होता. 

आईवडिलांसोबत पोहोचली सोनम..
- 'नीरजा' सिनेमातील अप्रतिम अभिनयासाठी सोनम कपूरला विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला
- सोनम कपूर तिचे आईवडील अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्यासोबत या सोहळ्यात सहभागी झाली आहे. 
- सोनम म्हणाली, "खूप छान वाटतंय. प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे मला हा पुरस्कार मिळेल, याची अपेक्षा नव्हती. मी गेल्या काही वर्षांपासून इश्यू बेस्ड सिनेमांवर काम करतेय. या पुरस्कारने मला आणखी चांगले काम करण्याचे बळ मिळाले आहे."
 
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील खास क्षण बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...