आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटम साँगपाहून लोक म्हणाले 'मोटी भैस', 'अंगुरी भाभी' ने हेटर्सना असे दिले उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टीव्ही शो 'भाबीजी घर पर हैं' फेम शिल्पा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आहे. अपकमिंग चित्रपट 'पटेल की पंजाबी शादी' मध्ये एका आइटम साँमध्ये ती झळकणार आहे. पण त्या गाण्यावरून तिला सोशल मीडियावर हेटर्सने चांगलेच ट्रोल केले आहे. अगदी काही लोकांनी तिला 'मोटी भैस' सारखे शब्द वापरून चिढवले. पण शिल्पानेही त्यांना थेट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. 

शिल्पा म्हणाली, किमान मी व्हल्गर दिसत नाही.. 
- शिल्पाने नुकत्याच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, मला माहिती आहे की गाण्यात मी जाड दिसत आहे. पण जेव्हा शुटिंग झाली तेव्हा मी जाड होते. मेकर्सने मला मी जाड होते तेव्हाच सिलेक्ट केले होते. 
- त्यानंतर मी 6-7 किलो वजन घटवले आहे. पण तरीही लोक माझ्या जाडपणावर गोंधळ घालत आहेत. 
- मला हे गाणे करताना खूप मजा आली. त्यासाठी डान्स करतानाही मला ऑकवर्ड झाले नाही, किंवा मी यात कुठेही व्हल्गरही दिसले नाही. 
- शिल्पा पुढे म्हणाली, लोकांनी मला कितीही ट्रोल केले तरी मला फरक पडत नाही. 
- हे गाणे नेहा कक्कड आणि ऐश्वर्या निगमने गायले आहे. ललित पंडितने कंपोज केले असून संजय छेलने लिरिक्स लिहिले आहेत. 

कोणी म्हटले पपई तर कोणी म्हटले चीप.. 
- अनेक लोक शिल्पाला चीप अँड फॅट म्हणत आहेत काही लोकांनी मोटी भैस आणि फॅट की दुकान ही म्हटले. 
- एका यूझरने ट्वीट करताना लिहिले, 'अंगूरी तो पपीता लग रही है' 
- दुसऱ्या एका यूझरने लिहिले, 'भाबीजी आपने न हो पाएगा.. आप कॉमेडी मेही फिट हो.. डान्समे आप फॅट हो।" अशा अनेक कमेंट्सने तिला ट्रोल केले जात आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, शिल्पाच्या गाण्यातील काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...