Home »News» Bhojpuri Actress Anjali Srivastava Commits Suicide

भोजपुरी अभिनेत्री अंजलीची गळफास घेऊन आत्महत्या, मुंबईत राहात होती भाड्याच्या घरात

दिव्य मराठी वेब टीम | Jun 20, 2017, 09:44 AM IST

मुंबई -नवाेदित अभिनेत्री अंजली श्रीवास्तव(२९) हिने अंधेरी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. अंजलीने काही भोजपुरी चित्रपटात काम केले आहे.

अंजली ही अंधेरी येथील परिमल सोसायटीत राहत होती. तिला तिचे नातेवाईक वारंवार फोन करत होते. मात्र, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी अंजली राहत असलेल्या घराच्या मालकांशी संपर्क साधला. त्यांनी दुसऱ्या चावीने खोलीचा दरवाजा उघडला असता त्यांना अंजलीचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अंजलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट सापडली नाही. त्यामुळे अंजलीच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
दरम्यान, गेल्याच आठवड्यात मॉडेल कृतिका चौधरी हिची राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. पाच दिवसांनतर तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. तिने शेवटचा फोन ज्या व्यक्तीला केला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

Next Article

Recommended