Home »News» Bhojpuri Film Actor Satyendra Singh Interview

सीन शूट करण्यास अॅक्ट्रेसने दिला होता नकार, अॅक्टरने सांगितले शूटिंगचे हे किस्से

दिव्य मराठी वेब टीम | Nov 13, 2017, 15:47 PM IST

वाराणसी/मुंबई- उत्तर प्रदेशातील आझमगडध्ये शूट झालेली भोजपूरील फिल्म 'द पावर ऑफ दहशत' एक डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. फिल्मचा हिरो सत्येंद्र सिंह आणि हिरोईन प्रियंका पंडित आहे. DivyaMarathi.Com सोबत केलेल्या खास बातचीतमध्ये सत्येंद्र सिंहने शूटिंग दरम्यानचे इंट्रेस्टिंग किस्से सांगितले.
तो म्हणाला, थंडीचे दिवस होते. आम्हाला रात्रीच्या वेळी पावसात भिजत सीन शूट करायचा होता. अॅक्ट्रेस प्रियंकाने शूटला नकार दिला. ती म्हणाली, 'अशा थंडीत पाणी अंगावर पडल्यावर मी गोठून जाईल शूटिंग कशी करणार.' त्यावर सर्व क्रू परेशान झाला होता. त्यानंतर मी तिला हिम्मत दिली आणि शूटिंगच्या ठिकाणी आगीची (शेकोटी) व्यवस्था केली आणि सीन शूट झाला.
वडील म्हणाले, माझ्यासाठी हेच खूप आहे...
- सत्येंद्र बनारसचा राहाणार आहे. येथील हरिश्चंद्र कॉलेजमध्ये त्याचे शिक्षण झाले. सत्येंद्रने सांगितले, की फिल्मचे कथानक दोन दशकांपूर्वी आझमगडमध्ये असलेल्या व्हाइट कॉलर दहशतवाद्यांच्या सत्यकथेवर आधारीत आहे. त्यामुळे शूटिंग आझमगडमध्ये करण्याचे ठरले होते.
- सत्येंद्र या फिल्ममध्ये पोलिस अधीक्षकाच्या भूमिकेत आहे. तो म्हणाला मी तीन महिने पोलिसांसोबत राहिलो आणि वर्दीमध्ये ते कसे चालतात, पोलिस स्टेशनमध्ये कसे बोलतात याचे निरीक्षण केले.
- एक दिवस आझमगडचे पोलिस अधिकारी शूटिंग पाहाण्यासाठी आले होते, तेव्हा ते म्हणाले, 'अरे, यार खरा एसपी तर तु दिसत आहेस.'
- सत्येंद्रचे वडील पोलिस खात्यातून निवृत्त झाले आहेत. फिल्मचा प्रोमो पाहिल्यानंतर ते म्हणाले, 'माझा मुलगा रियल लाइफमध्ये एसपी होऊ शकला नाही मात्र रिल लाइफमध्ये एसपी बनून त्याने माझी इच्छा पूर्ण केली. हेच माझ्यासाठी खूप आहे.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा शूटचे काही निवडक फोटो...

Next Article

Recommended