आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसनंतर या अॅक्ट्रेसने दुप्पट केली फीस, भोजपुरी चित्रपटांत मिळेना काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर भोजपुरी अॅक्ट्रेस मोनालिसाला आता भोजपुरी चित्रपटांत काम मिळत नसल्याचे चित्र आहे. बिग बॉसच्या घरात प्रियकराबरोबर लग्न केल्यानंतर मोनालिसा प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर तिने भोजपुरी चित्रपटांसाठीची फीस दुप्पट केली. पण फीस वाढल्याने आता तिला चित्रपट मिळणेच बंद झाले आहे. 

तील लाखांहून वाढवून सहा लाख केली फीस 
- मोनालिसाला एका भोजपुरी चित्रपटासाठी आधी 2.5 लाख ते 3 लाख रुपये मिळत होते. वर्षाला 5-6 चित्रपट करणाऱ्या मोनालिसाचे नाव आघाडीच्या भोजपुरी अॅक्ट्रेसेसमध्ये होते. 
- बिग बॉसमधून आल्यानंतर मोनालिसाने फीस 6 लाख केली आहे. अनेक निर्मात्यांनी मोनालिसाशी चर्चा केली, पण कोणीही तिला दुप्पट फीस द्यायला तयार नाही. 
- मोनालिसाकडे सध्या एकही भोजपुरी चित्रपट नाही. पण पती विक्रांत सिंहच्या 'नथुनिया पर गोली मारे 2' मध्ये ती एक आयटम साँग करताना दिसणार आहे. 

2016 पासून कमी झाले चित्रपट 
- मोनालिसाने भोजपुरीमध्ये 100 पेक्षा जास्त चित्रपट केले आहे. पण गेल्या दोन वर्षांत तिच्या चित्रपटांची संख्या घटली आहे. 
- 2015 मध्ये मोनालिसाने 'सुहाग', 'राजाबाबू', 'प्रेमलीला' आणि 'सईया तूफानी' हे चार चित्रपट केले होते. 
- मोनालिसाने 2016 मध्ये 'नथुनिया' आणि इतर दोन लहान चित्रपट केले होते. 
- 2017 मध्ये पवन सिंहबरोबर 'सरकार राज' आणि पती विक्रांत सिंहबरोबर 'जय श्री राम' केले. हे चित्रपटही तिला बिग बॉसमध्ये जाण्याआधी भेटले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, मोनालिसाचे काही PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...