आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Big Bचा केक कापण्यास नकार, तोंडाला केक लावणे हे बिनकामाचे; 'मी राष्ट्रपती होणार हा विनोद'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमिताभ बच्चन यांच्या सर्वात चर्चेत असलेल्या चित्रपटातील भूमिकेत त्यांचे नाव “विजय’ असे आहे. यंदा त्यांनी आपला ७४ वा वाढदिवस देखील विजयादशमीच्या दिवशी साजरा केला. दरवेळीप्रमाणे याही वर्षी मोठा केक मागवण्यात आला. मात्र, अमिताभ यांनी यंदा केक कापण्यास नकार दिला. या आधी मी केक कापत होतो. मात्र, आता केक कापणार नसल्याचे त्यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त पत्रकारांशी बोलताना अमिताभ म्हणाले की, केक का मागवण्यात येतो...? केकच का मागवण्यात येतो...? त्यावर मेणबत्ती का लावण्यात येते..? तिला का पेटवण्यात येते..? पेटवल्यानंतर सांगतात आता विझवा. त्यानंतर तुमच्या समोर एक खुनी चाकू येतो, त्यानंतर केक कापावा लागतो, नंतर सांगतात तो कोणाला तरी भरवा. आता तर एक नवीन प्रथा सुरू झाली आहे, सर्व झाल्यानंतर केक तुमच्या चेहऱ्यावर लावण्यात येतो. हे सर्व का होते..? हे सर्व अामच्या समजन्याच्या पलिकडचे आहे.’

अमिताभ यांनी अनेक मुद्द्यांवर पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. राष्ट्रपती पदासाठी तुमचे नाव निवडण्यात आले तर..? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. मला राष्ट्रपती बनण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले. असे काही होणार नसून हा तर शत्रुघ्न बाबूंनी माझ्याशी केलेली विनोद असल्याचे ते म्हणाले.

जीवनातील बदलांबाबत ते म्हणाले, आपण दररोज श्वास घेत आहोत, हेदेखील नवीन आहे. याचप्रमाणे श्वास सुरू राहिला तर काम करत राहणार. मात्र, त्यातील किती श्वास चांगला घेतला किंवा खराब घेतला हे सांगता येणार नाही. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्तदेखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. ऑक्टोबर महिन्यात ज्या-ज्या लोकांचे वाढदिवस येतात, त्या सर्व लोकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. “काही मोठे चित्रपट स्टुडिओ बंद झाले, या प्रश्नावर ते म्हणाले की, हा चिरायू उद्योग आहे. नेहमीच जिवंत राहील आणि सुरूच राहील. काही अडचणी येत असतात, तर काही यशही मिळते. मात्र, हा चित्रपट उद्योग सुरूच राहील.'
हॉलीवूडच्या आव्हानांबाबत विचारल्यावर आपल्याला घाबरण्याची आवश्यक नसून त्याचा सामना करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

ही वेळ सैनिकांसोबत उभे राहण्याची
उरीमध्येशहीदांवर गाणे म्हणण्याचा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, ते सर्व चुकीचे असल्याचे अमिताभ म्हणाले. मी एका कार्यक्रमात असताना एक खासदार माझ्या समोर आले. त्यांनी मला एक गाणे ऐकवण्याची विनंती केली. या व्यतिरिक्त काहीच घडले नसल्याचे त्यांनी सांगितले. पाक कलाकारांविषयी काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. ही वेळ या विषयावर चर्चा करण्याची नसून आपल्या सैनिकांसोबत उभे राहण्याची आहे. ते आपले प्राण धोक्यात घालून आपल्याला सुरक्षा देत असल्याचे बच्चन यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...