आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बी, प्रियांकाने मध्यरात्री घेतले लालबाच्या राजाचे दर्शन, नरीमन पॉईंटवर केले Enjoy

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. सामान्य भक्तांप्रमाणेच बॉलिवूडचे सेलेब्सही सद्या गणरायाच्या भक्तीत लीन होत आहेत. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत बॉलिवूड सेलिब्रिटींचा सर्वाधिक ओढा असतो, तो लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याचा. सेलिब्रिटी मोठ्या संख्येने लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जात असतात. रविरवारी मध्यरात्रीनंतरची बॉलिवूडचे दोन प्रसिद्ध चेहरे लालबागच्या राजासमोर नतमस्तक झाले. हे दोन सेलिब्रिटी म्हणजे, बिग बी अमिताभ बच्चन आणि प्रियांका चोप्रा. या दोघांनीही रात्री उशीरा लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. प्रियांका चोप्रा तर रात्री दर्शनानंतर थेट पोहोचली नरीमन पॉइंटवर. रात्रीच्या शांततेच सागराच्या किनारी वेगळा अनुभव तिने घेतला. चला तर मग पाहुयात प्रियांका बिग बींच्या दर्शनाची एक झलक.. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रियांकाच्या दर्शनाचे आणि समुद्रकिनाऱ्यावरचे काही PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...