आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अजूबा\' रिलीज होऊन पूर्ण झाली 24 वर्षे, Big Bने शेअर केले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अजूबा)
मुंबई- अमिताभ बच्चन यांचा सुपहिट सिनेमा 'अजूबा' रिलीज होऊन आज 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. बिग बी यांनी याची माहिती सोशल नेटवर्किंग साइट टि्वटवर दिली आहे. सोबतच, त्यांनी सिनेमाशी निगडीत काही फोटोसुध्दा शेअर केले आहेत.
12 एप्रिल 1991मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती शशी कपूर यांनी केले होते. बिग बींशिवाय सिनेमात ऋषी कपूर, शम्मी कपूर, डिम्पल कपाडिया यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
मोठी स्टारकास्ट असूनदेखील सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नव्हता. सिनेमाच्या कमकुवत पटकथेमुळे सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र हा सिनेमा मुलांना भावला होता. 'अजूबा' शशी कपूर यांच्या जिवनातील सर्वात मोठी चूक ठरली होती. या सिनेमाचे त्यांना मोठे नुकसान झेलावे लागले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिग बी यांनी पोस्ट केलेल्या 'अजूबा' सिनेमाचे फोटो...