आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Big B चा खुलासा - 'शोले'मधील हा सीन शूट करायला लागला होता तब्बल तीन वर्षांचा कालावधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः 1975 साली रिलीज झालेला दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा शोले हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक आयकॉनिक सिनेमा आहे. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, जया बच्चन यांचा हा सिनेमा अनेकांनी कितीतरी वेळा पाहिला आहे. या सिनेमाशी निगडीत एक आठवण अमिताभ बच्चन यांनी नुकतीच एका कार्यक्रमात सांगितली. ‘रमेश सिप्पी अकॅडमी ऑफ फिल्म अॅन्ड एन्टरटेन्मेन्ट’च्या उद्घाटन सोहळ्यावेळी अमिताभ बच्चन यांनी उपस्थितांसमोर ही आठवण सांगितली.
 
हा सीन शूट करायला लागला होता तीन वर्षांचा काळ... 
‘शोले’तील एका दृश्यासाठी दिग्दर्शकांना तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली होती, असे सांगत अमिताभ बच्चन म्हणाले, ‘तुम्हाला ‘शोले’तील ते दृश्य आठवतेय का? ज्यामध्ये जया (बच्चन) गॅलरीत येऊन दिवा लावत असते आणि मी समोरच्या घराजवळ (आऊट हाऊसमध्ये) बसून माऊथॉर्गन वाजवताना दिसतो. त्या एका दृश्यासाठी ठराविक प्रकाशाची (प्रकाशयोजनेची) गरज होती. आमचे डीओपी मि. दिवेचा सूर्यास्तावेळी त्या दृश्याचे चित्रिकरण करु इच्छित होते. तुम्हाचा या गोष्टीवर विश्वासही बसणार नाही की, रमेशजींनी त्या एका दृश्याच्या चित्रिकरणासाठी 3 वर्षे वाट पाहिली, तेव्हा कुठे जाऊन त्यांना शेवटी हवेतसे दृश्य चित्रित करता आले.’

त्या एका दृश्याबद्दलची आठवण आणखीन रंगवून सांगताना अमिताभ म्हणाले, ‘जेव्हा जेव्हा आम्ही त्या दृश्याचे चित्रिकरण करायचो तेव्हा प्रकाशयोजनेत काहीतरी त्रुटी निघायच्या. त्यातही हवा तसा प्रकाश मिळाल्याशिवाय आपण या दृश्याचे चित्रिकरण करायचे नाही असे रमेशजींनी सांगितल्यामुळे आम्ही सर्वांनी त्या एका दृश्यासाठी 3 वर्षे वाट पाहिली.’
 
पुढील स्लाईड्सवर बघा, 'शोले'चे Behind-The-Scenes, सोबतच वाचा, सिनेमाशी निगडीत रंजक गोष्टी... 
बातम्या आणखी आहेत...