आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big Boss Fame Actress Pooja Mishra Blame Sonakshi Sinha And Her Mother Poonam

पूजा मिश्राचा आरोप, \'सोनाक्षी आणि तिच्या आईच्या सांगण्यावरून माझी छेडछाड\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- टीव्ही शो 'बिग बॉस'मध्ये झळकलेली मॉडेल आणि अभिनेत्री पूजा मिश्राने भाजप खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा आणि पत्नी पूनम यांच्यावर गंभीर आरोप लावला आहे. दोन दिवसांपूर्वी उदयपूर येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या कथित छेडछाडीच्या प्रकरणात पूजाने सांगितले, की सोनाक्षी आणि तिची आई पूनम यांच्या सांगण्यावरून तिची छेड काढण्यात आली.
पूजा काय म्हणणे आहे?
पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत पूजाने सांगितले, की सोनाक्षी सिन्हा आणि तिची आई पूनम दिर्घकाळापासून तिला त्रास देत आहेत. त्या तिच्यासोबत ठिक-ठिकाणी अशा घटना घडून आणत आहेत. पूजाने सांगितले, 'मी जिथे जाते, तिथे माझ्यासोबत अशी घटना घडते. सोनाक्षीची आई मला का त्रास देत आहे, मला ठाऊक नाही.' या प्रकरणाची चौकशी करत असलेले पोलिस याला केवळ पब्लिसिटी स्टंट मानत आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
10 एप्रिलच्या रात्री दोनच्या सुमारास पूजा उदयपूर येथे आली. येथे 14 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता इव्हेंट मॅनेजर आणि काही परिचित लोकांसोबत ती डिनरला गेली. तेथून रात्री बाराच्या सुमारास ती हॉटेलमध्ये परतली आणि चहा घेतला. गाढ झोपेतून उठल्यानंतर आपल्याला कुणीतरी चहा किंवा खाण्यातून गुंगीचे औषध दिल्याचे तिच्या लक्षात आले. रात्री झोपेतच कुणीतरी रात्री आपल्यावर अत्याचार केल्याचे तिने म्हटले. यापूर्वी म्हणजे 13 एप्रिल रोजी पूजाने बॅगेतून दागिने चोरीला गेल्याचे म्हटले होते.