आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवराजसिंगच्या वहिनीचा Bigg Bossमध्ये खळबळजनक खुलासा! सासूमुळे सोडले नव-याला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बहुप्रतिक्षित बिग बॉसचे दहावे पर्व छोट्या पडद्यावर दाखल झाले आहे. या शोचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच सेलिब्रिटींसोबत सामान्य लोकांना शोमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. १५ स्पर्धकांमध्ये गुडगावची राहणारी २५ वर्षीय युवती आकांक्षा शर्मा हिच्या नावाचा समावेश आहे. आकांक्षा प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराजसिंगच्या धाकट्या भावाची पत्नी आहे. २०१४ मध्ये युवराजचा धाकटा भाऊ जोरावर सिंगसोबत आकांक्षाचे लग्न झाले होते. मात्र चार महिनेसुद्धा हे लग्न टिकू शकले नाही. बिग बॉसमध्ये इमोशनल झाली आकांक्षा...

बिग बॉसच्या मंचावर सलमानसोबत आपले दुःख व्यक्त करताना आकांक्षा भावूक झाली होती. आकांक्षाने बिग बॉसमध्ये एन्ट्रीच्या वेळी सलमानला सांगितले, 'त्या लग्नातून मी पुढे निघून गेली आहे. पण अद्याप आमचा घटस्फोट झालेला नाही. लग्नानंतर एक वेळ असं वाटलं की, जगण्यापेक्षा मरण बरं.'
तिने पुढे सांगितले, की तेव्हा आपल्या पालकांना याबाबत काहीही सांगितलं नव्हतं. एक वेळ असाही होता की, तिच्याकडे फक्त 3000 रुपये होते आणि ती आपल्या सासरहून पळून जाण्याचा विचार करीत होती. त्यावेळी आकांक्षाच्या भावाने तिला समजावले की, तिला तिचे आयुष्य पुढे नेणे गरजेचे आहे. त्या मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी तिने आता बिग बॉसमध्ये येण्याचा निर्णय घेतला.

युवराजच्या आईला ठरवले जबाबदार...
आकांक्षाने नव-यापासून विभक्त होण्यामागे तिच्या सासूबाई आणि युवराज सिंगच्या मातोश्री शबनम सिंग जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप केला. सासूच्या विचित्र वागण्यामुळे घर सोडल्याचे तिने सांगितले. आकांक्षा पुढे म्हणाली, की तिला फक्त लग्नापासून स्वातंत्र्य हवं आहे. यासाठी तिला पैसे किंवा युवराजच्या कुटुंबाकडून दुसरे काहीही नको.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा आकांक्षा शर्माचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...