Home »News» Bigg Boss 11 Priyank Sharma Shaves Off His Head For Hiten Tejwani

Bigg Boss मध्ये सुरु आहे मैत्रीची परीक्षा, या कंटेस्टंटने केले मुंडन

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 14:06 PM IST

  • प्रियंक शर्माने स्वतःचे मुंडन केले.
मुंबई - सलमान खानचा शो बिग बॉस-11 मध्ये ट्विस्ट शोने दोन जणांना बाहेर केले आहे. त्यात एक सब्यसाची सतपती तर दुसरी मेहजबी सिद्दीकी होती. आता या आठवड्यात शोमध्ये नवे ट्विस्ट सुरु झाले आहे. बिग बॉसने घरातील सदस्यांना एक टास्क दिले आहे. त्यामुळे कोण-कोणाचा खरा मित्र आहे, हे समोर येणार आहे.
- बिग बॉसने गार्डन एरियामध्ये एक छोटेखानी टॉवर उभे केले आहे. त्या ठिकाणी एक फोन बुथ तयार केला आहे. कंटेस्टंटला पायऱ्या चढून फोन बुथपर्यंत जावे लागते. दुसरे असे की जो कंटेंस्टंट फोन रिसिव्ह करतो तो पुढच्या आठवड्यासाठी नॉमिनेट होतो. जर त्याला सेफ राहायचे असेल तर तो आपल्या मित्राला एक टास्क देतो त्याने टास्क पूर्ण केला तर तो खेळात कायम राहातो.
- पहिला फोन हिना खान रिसिव्ह करते. बिग बॉस तिला सांगतात की तु या आठवड्यासाठी नॉमिनेट झाली आहे. तुला खेळात कायम राहायचे असेल तर तुझा फ्रेंड लवने सपना चौधरीच्या हाताने त्याच्या कपाळावर झिरो (ZERO) लिहून घ्यायचे आहे.
प्रियंक शर्माला करावे लागले टक्कल
- हितेनने बिग बॉसचा फोन रिसीव्ह केल्यानंतर त्याला सेफ ठेवण्यासाठी प्रियंक शर्माला टास्क करावा लागला. बिग बॉसने हितेनला सांगितले, प्रियंक जर त्याच्या डोक्यावरील सर्व केस काढणार असेल (मुंडन) तर तू खेळात सेफ राहाशील. त्यानंतर प्रियंकने हितेनसाठी आपल्या केसांचे बलिदान दिले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रियंकचे झाले मुंडन VIDEO

Next Article

Recommended