आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बॉस'चा एक्स-स्पर्धक एजाजवर FIR दाखल, मॉडेलला पाठवले अश्लिल मेसेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉसमध्ये स्पर्धक राहिलेला अभिनेता एजाज खान - Divya Marathi
बिग बॉसमध्ये स्पर्धक राहिलेला अभिनेता एजाज खान
मुंबई. बिग बॉसमधून चर्चेत आलेला अभिनेता एजाज खानच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मॉडेल ऐश्वर्या चौबेने त्याच्या विरोधात अश्लिल मेसेज आणि फोटो पाठवल्याचा आरोप लावला आहे. ऐश्वर्या कश्मिरची रहिवासी आहे आणि स्वत:ला सलमान खानची चाहती असल्याचे सांगितले.
मेसेज पाठवून हॉटेल बोलवल्याचा मॉडेलचा आरोप...
- ऐश्वर्या चौबेने वर्सोवा पोलिस ठाण्यात एजाजच्या विरोधात तक्रार दाखल केली.
- तिने सांगितले, की एकेदिवशी एजाजने जुहूच्या हॉटेलमध्ये बोलवण्याचा प्रयत्न केला होता. त्यादरम्यान अश्लिल मेसेज पाठवले.
- वर्सोवा ठाण्यातील पोलिसांनी एजाजला समन्स पाठवला. मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आली नाहीये.
कोण आहे एजाज खान?
- एजाज बिग बॉसमधून चर्चेत आला आहे.
- बिग बॉसमध्ये त्याचा को-कंटेस्टंट अलीला मारहाण केल्याच्या आरोपावरून त्याला घराबाहेर काढण्यात आले होते.
- बिग बॉसमध्ये त्याने अनेक स्पर्धकांना मारहाण केली होती.
- काही हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमांतसुध्दा त्याने काम केले आहे. त्याच्या प्रतिमेवर नेहमी प्रश्न उभा राहिले आहेत.
- मागील वर्षी 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' शोमध्ये त्याचा एपिसोड टेलिकास्ट न झाल्यानेसुध्दा त्याने नाराजी व्यक्त केली होती.
- नाराज एजाजने कपिल शर्मावरसुध्दा राग व्यक्त केला होता. एजाज म्हणाला होता, कपिल स्वत:ला शाहरुख आणि सलमान खान समजू लागला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एजाज खानने मॉडेलला पाठवलेले मेसेज...
बातम्या आणखी आहेत...