आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bigg Boss Contestant Diana Hayden Pregnant With Twins At 44 With Froze Eggs Techniques

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वयाच्या चाळिशीत या MISS WORLDने केले होते लग्न, आता 44व्या वर्षी देणार जुळ्या मुलांना जन्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 1997 साली मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी करणारी डायना हेडन पुन्हा एकदा गर्भवती असून ती लवकरच जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. विशेष म्हणजे डायनाची ही प्रेग्नेंसी सामान्यपद्धतीने झालेली नसून, तीन वर्षांपूर्वी जतन करून ठेवलेल्या बीजांच्या (फ्रोझन एग्ज) माध्यमातून ती आई होणार आहे. 44 वर्षीय डायनाने जानेवारी 2016 मध्ये फ्रोझन एग्ज पद्धतीनेच पहिल्या बाळाला जन्म दिला होता. त्यावेळी आठ वर्षांपूर्वी जतन केलेल्या बीजातून तिला अपत्यप्राप्ती झाली होती. डायना 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये वाइल्ड कार्डच्या माध्यमातून सहभागी झाली होती. पण 13 व्या आठवड्यात ती बाहेर पडली होती.


वयाच्या 40व्या वर्षी केले होते लग्न... 
- 1997 साली मिस वर्ल्ड ठरलेल्या डायनाने 2003 साली 'तहजीब' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते.
- नंतर ती 'अब बस' (2003), 'ओथेलो: अ साउथ अफ्रीकन टेल' (2006) या चित्रपटांमध्ये आणि 'होल्बी सिटी'(2003) या टीव्ही सीरिजमध्ये झळकली होती. पण तिला अभिनय क्षेत्रात फारसे यश मिळू शकले नाही.
- अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करु न शकल्यानंतर डायनाने 13 सप्टेंबर 2013 रोजी बॉयफ्रेंड कॉलिन डिक (Collin Dick) सोबत लग्न केले.
- 1 मे 1973 रोजी हैदराबाद येथे जन्मलेली डायना लग्नाच्या वेळी 40 वर्षांची होती.
- डायनाचे पती कॉलिन डिक लॉस वेगास (US) चे रहिवाशी असून ते मुंबईत एका इंटरनॅशनल एनजीओसोबत काम करतात.


1 मुलीची आई आहे डायना..
- डायना व कॉलिन लग्नबंधनात अडकले. त्याचवेळी तिला एंडोमेट्रिओसिस असल्याचे कळले होते. यास्थितीत महिलांना गर्भधारणेत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे टेस्ट ट्यूब बेबीसाठी डायनाने बीज गोठवण्याचा निर्णय घेतला होता.
- डायनाने आठ वर्षांपूर्वी फ्रोझन एग्स जतन करुन ठेवले होते. त्याच्या माध्यमातून ती 2016 साली पहिल्यांदा आई झाली. तिने जानेवारी 2016 मध्ये मुलीला जन्म दिला.
- इनफर्टिलिट स्पेशालिस्ट डॉ. नंदिता पालशेतकर यांच्या देखरेखीत तिने पहिल्या बाळाला जन्म दिला. 
- तर तीन वर्षांपूर्वी जतन करुन ठेवलेल्या फ्रोझन एग्सच्या माध्यमातून डायना पुन्हा एकदा गर्भवती आहे. यावेळीसुद्धा डॉ. नंदिता पालशेतकर यांच्याकडे तिची ट्रीटमेंट सुरु आहे. 
- डायना यावेळी जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. 


मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी तिसरी भारतीय तरुणी आहे डायना... 
- डायना हेडन ही एक भारतीय विश्वसुंदरी आहे. 
- 1997 सालच्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा मुकुट जिंकणा-या डायनाने त्याच वर्षी सेशेल्समध्ये घेण्यात आलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. 
- रीता फारिया आणि ऐश्वर्या रायनंतर ही स्पर्धा जिंकणारी डायना तिसरी भारतीय महिला ठरली होती.


फ्रोझन एग पद्धत नेमकी काय आहे?
- गत काही वर्षांत अप्रत्य प्राप्तीच्या पद्धती प्रचंड आधुनिक झाल्या आहेत, असे डॉ. नंदिता पालशेतकर यांनी सांगितले. 
- चाळीशीत गर्भधारणेसाठी काही स्त्रिया बीज जतन करुन ठेवण्याची पद्धत वापरतात. 
- दशकभरापूर्वी ही पद्धत आव्हानात्मक मानली जात होती. पण आज हे तंत्रजान बरेच प्रगत झाले आहे. 
- पस्तिशीतील हजारो स्त्रिया बीज गोठवून ठेवत आहेत.
- आजच्या अनेक मुलींना लग्न करायचे नसते. तर कुणाला योग्य जोडीदाराचा शोध असतो. अशा महिला या तंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. 
- याअंतर्गत इनफर्टिलिटह तंत्राद्वारे महिला आपले बीज गोठवू शकतात आणि मग काही महिने वा वर्षांनंतर गर्भधारण करू शकतात. उणे 196 डिग्री सेल्सिअस तापमानात सुमारे 10 वर्षे हे बीज जतन करता येऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर बघा, डायना हेडनचे पती आणि मुलीसोबतचे निवडक PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...