आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha And Karan Won’T Have A Wedding Reception

बिपाशा-करणचे Wedding Reception कॅन्सल, 30 एप्रिलला अडकणार लग्नगाठीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर - Divya Marathi
बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर
मुंबई: बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर 30 एप्रिलला लग्नगाठीत अडकणार आहेत. दोघांचे लग्न बंगाली पध्दतीने होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु लग्नानंतर संध्याकाळी रिसेप्शन दिले जाईल आणि त्यात बॉलिवूडमधील कलाकार सामील होणार आहेत, असे म्हटले जात होते. परंतु वेडिंग रिसेप्शन होणार नाही असे वृत्त समोर आले आहे.
बातम्यांनुसार, बिपाशा आणि करण यांना लग्नात प्रायव्हसी हवी आहे. कदाचित त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दोघांचे लग्न मुंबईच्या सेंट रेजीस फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. लग्नाच्या एक दिवसापूर्वी मेंदी आणि संगीत सेरेमनी होणार आहे. रिसेप्शनऐवजी दोघे एक कॅज्युअल पार्टी होस्ट करणार आहेत. त्यात दोघांचे जवळचे फ्रेंड्स सामील होतील.
बिपाशा आणि करण लग्नासाठी उत्साही आहेत. हे सोशल मीडिया अकाऊंटवरून दिसते. कारण दोघे दररोज लग्नाविषयी काही ना काही शेअर करत असतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिपाशा-करणचे प्री-वेडिंग फोटोशूटचे PHOTOS...