आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha Basu And Karan Singh Grovers Wedding Ceremonies Begin

बिपाशा-करणच्या लग्नाच्या विधींना सुरुवात, संगीत सेरेमनीपूर्वी ट्विट केले Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवर यांच्या वेडिंग सेरेमनीला सुरुवात झाली आहे. आज रात्री मुंबईत त्यांची संगीत सेरेमनी होणारेय. या कार्यक्रमापूर्वी बिपाशाने काही फोटोज ट्विट केले आहेत. येत्या 30 एप्रिल रोजी बिपाशा बंगाली पद्धतीने करणसोबत विवाहबद्ध होणारेय. दोघे अलोन या सिनेमात एकत्र झळकले होते. त्यानंतर त्यांच्यात प्रेमांकुर फुलले. याच महिन्यात दोघांनी साखरपुडा केला होता.

कुणी दिली माहिती...
- फिटनेस एक्सपर्ट डियाना पांडेने इंस्टाग्रामवर एख फोटो पोस्ट केला आहे.
- ती म्हणाली, माझ्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नाच्या सेरेमनीला सुरुवात झाली आहे.
- डियाना वेडिंग सेरेमनीची जबाबदारी सांभाळत आहे.
- गुरुवारी रात्री संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
- 29 एप्रिल रोजी जुहूच्या एका क्लबमध्ये बिपाशा-करणच्या मेंदी सेरेमनीचे आयोजन करण्यात आले आहे.
- 30 एप्रिल रोजी लग्नानंतर संध्याकाळी फ्रेंड्स आणि इंडस्ट्रीतील काही निवडक लोकांच्या उपस्थितीत रिसेप्शन पार्टी होणारेय.
लग्नात काय परिधान करणार बिपाशा-करण?
- बिपाशाची स्टायलिस्ट श्यामली अरोराने सांगितले, की लग्नात दोघेही डिझायनर सब्ससाची मुखर्जीने डिझाइन केलेले कपडे परिधान करणार आहेत. बिपाशाचा ड्रेस लाल रंगाचा आहे.
- करणच्या ड्रेसचा शेडसुद्धआ बिपाशाच्या ड्रेसशी मॅच करणारा आहे. मात्र दोघांनाही एकमेकांच्या ड्रेसविषयी काहीच कल्पना नाहीये. दोघांसाठीही हे सरप्राइज असेल.
गिफ्ट्सचा होतोय वर्षाव...
- लग्नापूर्वीच करण आणि बिपाशाला मित्रांकडून गिफ्ट्स मिळू लागले आहेत.
- दोघांची फिटनेस ट्रेनर आणि मैत्रीण डियानाआ णि सुजैन यांनी त्यांच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव केला आहे.
बिपाशा-करणचे प्री वेडिंग फोटोशूट...
- बिपाशा आणि करणने 7 एप्रिल रोजी लग्नाची घोषणा केली होती.
- त्यानंतर दोघांनी एक खास प्री वेडिंग फोटोशूट केले होते.
- या फोटोजसोबत त्यांनी आपल्या नातेवाईक आणि मित्रांना वेडिंग इन्व्हिटेशन पाठवले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बिपाशा-करणच्या लग्नाच्या तयारीची, प्री वेडिंग फोटोशूट आणि गिफ्ट्सची खास झलक...