आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... हेअर स्टाइलिस्टच्या चुकीने भाजली बिपाशा बसू, इंस्टाग्रामवर शेअर केला फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः अलीकडेच एका शूटिंगदरम्यान अभिनेत्री बिपाशा बसूसोबत एक अपघात घडला आहे. एका शुटिंगदरम्यान बिपाशा बसूचा चेहरा आणि हात भाजला गेला आहे. यानंतर बिपाशा बसूने आपले काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत आणि संपुर्ण घटनाही सांगितली आहे. बिपाशावर शुटिंगसाठी तयार होत असताना तिच्या हेअर स्टाईलिस्टकडून एक गरम हेअर टोंग तिच्यावर पडले, ज्यामुळे तिचा चेहरा आणि हात भाजला गेला आहे. यानंतर बिपाशाने आपले फोटोज शेअर केले आहेत. या घटनेनंतरही बिपाशाने भाजलेल्या हात आणि चेहऱ्यासोबत शुटिंगला सुरुवात केली.
बिपाशाने आपल्या हेअर स्टाइलिस्टला जबाबदार ठरवत लिहिले, 'Started my day of shoot with multiple burns on my face and hands by a hairstylist. She dropped the tong on me and did not even flinch.'
बिपाशाने आपले फोटोज शेअर केल्यानंतर तिच्या फॅन्सला ही बातमी कळाली. यानंतर बिपाशाच्या चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे. यानंतर बिपाशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे आणि म्हटले, "पाहा मी स्वत:ला हेअर टोंग पासून कशा प्रकारे प्रोटेक्ट करत आहे. ही तीच हेअर स्टाईलिस्ट नाहीये’ (Post this careless accident ,See my way of protecting myself from the mighty Tong! Am well and working. Scars will take a while to go. FYI this is not the same stylist.)
तसेच बिपाशा बसूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही एक ट्विट करत म्हटले आहे, की मी व्यवस्थित आहे आणि काळजी घेणाऱ्या चाहत्यांचे आभारही मानले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बिपाशाने स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कशी घेतला आरशाची मदत, सोबतच पाहा तिने केलेले ट्विट्स...