आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha Shared Her Wedding Announcement With The Sweetest Picture

बिपाशा-करणचे प्री-वेडिंग Photoshoot, दिसली दोघांची रोमँटिक केमिस्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बिपाशा बसु आणि तिचा लाँग टाइम बॉयफ्रेंड करण सिंह ग्रोवरने 7 एप्रिलला एका जॉइंट स्टेटमेंटच्या माध्यमातून लग्नाची ऑफिशिअल अनाऊसमेंट केली आहे. दोघांचे लग्न 30 एप्रिलला मुंबईत होणार आहे. लग्नाला स्पेशल बनवण्यासाठी बिपाशा आणि करणने एक खास प्री-वेडींग फोटोशूट केले आहे. या फोटोंसोबत त्यांनी जवळच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे.
बिपाशाचा भावूक संदेश...
- या फोटोंसोबत बिपाशाने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक भावूक आणि क्युट मेसेज लिहिला आहे.
- तिने लिहिले, 'आम्ही ही बातमी तुमच्यासोबत शेअर केल्याने खूप आनंदी आहोत. 30 एप्रिल 2016 हा दिवस आमच्यासाठी खूप खास असणार आहे. आम्ही फॅमिली आणि फ्रेंड्स यांच्या उपस्थितीत लग्नगाठीत अडकणार आहोत.'
- हे लग्न एक खासगी समारंभ असणार आहे. आशा आहे, की तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर कराल. आम्हाला आमच्या नवीन आयुष्यासाठी तुमच्याकडून खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद मिळेल, अशीही अपेक्षा आहे.
करण आणि बिपासाची भेट 'अलोन' (2015) सिनेमाच्या सेटवर झाली होती. सिनेमा रिलीज झाल्यानंतर दोघे प्रत्येक इव्हेंट आणि पार्टीमध्ये सोबत दिसू लागले होते. दोघांचे सोशल अकाऊंट्स एकमेकांच्या फोटोंनी ओसांडून वाहत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बिपाशा-करणचे वेडींग फोटोशूट...