आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30th B\'day: सोनम कपूरचे बालपणीपासून ते आत्तापर्यंतचे निवडक PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - सोनम कपूर, उजवीकडे - अनिल कपूरसोबत सोनम)
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड स्टार सोनम कपूरची गणना अशा अभिनेत्रींमध्ये होते, ज्यांचे पदार्पणातील सिनेमे फ्लॉप ठरले, मात्र नंतर त्यांनी यशाची पाय-या चढली.
करिअरच्या सुरुवातीला मिळाले अपयश
9 जून 1985 रोजी प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या घरी जन्मलेल्या सोनमने संजय लीला भन्साळींच्या 'सावंरिया' या सिनेमाद्वारे आपल्या सिनेकरिअरची सुरुवात केली. 2007 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. मात्र सोनमचा पदार्पणातीलच सिनेमा फ्लॉप ठरला. पण या सिनेमाच्या माध्यमातून दोन स्टार्स बॉलिवूडला मिळाले. पहिला स्टार म्हणजे रणबीर कपूर आणि दुसरी म्हणजे सोनम कपूर.
'ब्लॅक'मध्ये संजय लीला भन्साळींची सहायक दिग्दर्शिका होती सोनम
रंजक बाबा म्हणजे, अभिनय क्षेत्राकडे वळण्यापूर्वी सोनम कपूरने संजय लीला भन्साळींकडे सहायक दिग्दर्शिका म्हणून काम केले. 'ब्लॅक' या सिनेमाची ती सहायक दिग्दर्शिका होती. याच काळात भन्साळींनी सोनमला 'सावंरिया' या सिनेमाची ऑफर दिली. मात्र त्यासोबतच तिला वाढलेले वजन कमी करण्याचा सल्लाही दिला. भन्साळींनी दाखवलेल्या विश्वासानंतर सोनमने दोन वर्षांत आपले जवळजवळ 35 किलो वजन कमी केले. 'सावंरिया' या सिनेमात काम करण्यापूर्वी सोनमने रोशन तनेजांच्या अॅक्टिंग स्कूलमध्ये अभिनयाचे धडे गिरवले होते.
'आय हेट लव्ह स्टोरी'द्वारे मिळाली ओळख
2009 मध्ये सोनमला दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरांच्या 'दिल्ली 6' या पॉलिटिकल ड्रामात अभिषेक बच्चनसोबत काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात ती लीड रोलमध्ये होती. त्यानंतर 2010 मध्ये तिचा 'आय हेट लव्ह स्टोरी' हा रोमँटिक कॉमेडी सिनेमा रिलीज झाला. सोनमला या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये खरी ओळख प्राप्त झाली. 2013 मध्ये रिलीज झालेला 'रांझणा' आणि 2014 मध्ये आलेला 'भाग मिल्खा भाग' हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले.
नीरजा भनोटच्या बायोपिकमध्ये झळकणार
या सिनेमांव्यतिरिक्त सोनमने ‘खूबसूरत’, ‘आयशा’, ‘थँक्यू’, ‘प्लेअर्स’, ‘बेवकूफियां’ आणि ‘डॉली की डोली’ या सिनेमांमध्येही काम केले. सध्या ती आपल्या आगामी दोन सिनेमांवर काम करत आहे. 'प्रेम रतन धन पायो' आणि 'नीरजा भनोट' ही तिच्या आगामी सिनेमांची नावे आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सोनमची बालपणीपासून ते आत्तापर्यंतची निवडक छायाचित्रे...