आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day: एकेकाळी असे दिसायचे करण जोहर, आज आहे बॉलिवूडचे \'स्टायलिश मॅन\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे करण जोहर, उजवीकडे - करणचे बालपणीचे छायाचित्र, खाली- शाहरुख खानसोबत करण जोहर.)
मुंबईः बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, पटकथा लेखक आणि कॉश्च्युम डिझायनर करण जोहर 43 वर्षांचे झाले आहेत. 25 मे 1972 रोडी निर्माते यश जोहर आणि हीरु जोहर यांच्या घरी करणचा जन्म झाला.
दिग्दर्शन क्षेत्रात कमावले नाव
करणने 1998 मध्ये रिलीज झालेल्या 'कुछ कुछ होता है' या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी स्टारर हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमासाठी करणला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि बेस्ट स्क्रिनप्लेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2001 मध्ये 'कभी खुशी कभी गम', 2006 मध्ये 'कभी अलविदा ना कहना' हे त्यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे रिलीज झाले. हे सर्व सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. 2010 मध्ये रिलीज झालेल्या 'माय नेम इज खान' या सिनेमासाठी त्यांना दुस-यांदा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हे सर्व सिनेमे त्यांच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरमध्ये तयार झाले होते.
निर्माता म्हणूनही ठरले यशस्वी
2004मध्ये वडील यश जोहर यांच्या निधनानंतर करण यांनी धर्मा प्रॉडक्शनची धुरा सांभाळली. निर्माता म्हणून त्यांनी आणलेले सिनेमे हिट ठरले. निर्माता म्हणून करण जोहर यांनी ‘कल हो ना हो’, ’दोस्ताना’, ’आई हेट लव स्टोरी’, ’अग्निपथ’ आणि ‘ये जवानी है दीवानी’ हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणले.
कॉश्च्युम डिझायनर म्हणूनही ओळखले जातात...
करण जोहर यांनी काही सिनेमांसाठी कॉश्च्युम डिझायनर म्हणूनसुद्धा काम केले आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘डुप्लीकेट’, ‘मोहब्बतें’, ‘मैं हूं ना’, ‘वीर-जारा’ आणि ‘ओम शांति ओम’ या सिनेमांचा समावेश आहे.
टीव्ही इंडस्ट्रीतसुद्धा केली एन्ट्री
करण जोहर केवळ बिग स्क्रिनवरचेच नव्हे तर स्मॉल इंडस्ट्रीतीलही प्रसिद्ध नाव आहे. 2004 मध्ये त्यांनी 'कॉफी विथ करन' हा सेलिब्रिटी टॉक शो प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या शोमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री, निर्माते, दिग्दर्शक सहभागी झाले होते. या शोचे आजवर चार पर्व आले होते. 2013 ते 2014 या काळात या शोचे चौथे पर्व टीव्हीवर प्रसारित झाले होते. याशिवाय 'झलक दिखला जा' आणि 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमध्ये परीक्षकाच्या रुपातही करण दिसले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा करण जोहर यांची बालपणीपासून ते आत्तापर्यंतची निवडक छायाचित्रे...