आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Anniv. : \'मोगेम्बो खुश हुआ\', अमरीश पुरी यांचे Famous Dialogues

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 'मोगेम्बो खुष हुआ...' 'मि. इंडिया' या सिनेमातील हा डायलॉग आजसुध्दा ऐकला तरी दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. बॉलिवूडचे महान खलनायक आज या जगात नाहीत, मात्र त्यांचे असे काही डायलॉग आहेत, जे आजही त्यांच्या चाहत्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात.
आज त्यांची आठवण काढण्याचे कारण म्हणजे, 22 जून 1932 रोजी त्यांचा जन्म लाहोर, पंजाबमध्ये झाला होता. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये खलनायकी भूमिका साकारून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. 12 जानेवारी 2005 रोजी अमरीश पुरी यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचा मृत्यू मुंबईमध्ये झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्तमानपत्रात 'मोगेम्बो खामोश हुआ' अशा मन हेलावणा-या हेडलाइन दिसत होत्या. जगभरात त्यांच्या निधनाने एक शांतता पसरली होती.
अमरीश पुरी सिनेमांमध्ये जरी खलनायकाच्या रुपात प्रसिध्द असले तरी ख-या आयुष्यात मात्र एक हीरो होते. अमरीश पुरी या जगातून गेल्यानंतर आजपर्यंत बॉलिवूडमध्ये त्यांच्यासारखा दुसरा खलनायक आला नाही.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त divyamarathi.comकडून अमरीश पुरी यांना श्रध्दांजलीच्या रुपात त्यांचे काही प्रसिध्द डायलॉग्स...