आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : 2 वर्षांचा झाला ज्युनिअर किंग खान, क्युट स्माइलने बनवले लाखो फॅन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अबराम खान)
मुंबईः बॉलिवूडचा किंग अर्थातच सुपरस्टार शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम खान आज दोन वर्षांचा झाला आहे. 27 मे 2013 रोजी सरोगसीच्या माध्यमातून अबरामचा जन्म झाला. जन्मापासूनच अबराम लाइमलाइटमध्ये आहे. सुहाना आणि आर्यननंतर अबराम शाहरुखचा तिसरा मुलगा आहे. शाहरुखने गेल्यावर्षी ईदच्या मुहूर्तावर अबरामचे पहिले छायाचित्र आपल्या चाहत्यांसाठी ट्विटरवर शेअर केले होते. पहिल्या छायाचित्रात शाहरुख अबरामला गोंजारताना दिसला होता. चाहत्यांना वडील-मुलाचे हे छायाचित्र खूप भावले होते.
आपल्या क्युट लूक्समुळे अबराम बी टाऊनमधील सर्वात चर्चित स्टार किड्सपैकी एक आहे. अबराम केवळ दोन वर्षांचा असला तरी त्याची फॅन फॉलोईंग एखाद्या मोठ्या स्टार एवढी आहे. त्याला ज्युनिअर किंगसुद्धा म्हटले जाते. कधी एअरपोर्टवर, कधी मॉलमध्ये तर कधी क्रिकेटच्या मैदानावर दिसलेल्या अबरामने आपल्या प्रत्येक अंदाजाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अबराम खानचे फॅमिलीसोबतचे क्यूट फोटोज...