आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 29 वर्षांची झाली अनुष्का शर्मा, बालपणी दिसायची अशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अनुष्का शर्मा 29 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 1 मे 1988ला अयोध्यामध्ये (उत्तर प्रदेश) झाला. तिचा वडील कर्नल अजय कुमार शर्मा आर्मी ऑफिसर आहेत आणि आई आशिमा शर्मा होममेकर आहे. अनुष्काला एक थोरला भाऊसुध्दा आहे. त्याचे नाव कारनेश आहे. अनुष्काने आर्मी स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आणि माऊंट कारमेल कॉलेजमधून (बंगळुरु) पदवी शिक्षण पूर्ण केले.

मॉडेलिंगमधून सुरु केले करिअर...
शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुष्का मुंबईला आली आणि मॉडेलिंगला सुरुवात केली. 2007मध्ये तिला मॉडेलिंगमध्ये पहिला ब्रेक मिळाली. त्यावेळी लॅक्मे फॅशन वीकदरम्यान वेंडेल रोड्रिक्ससाठी मॉडेलिंग केली होती. 2008मध्ये तिने आदित्य चोप्राच्या 'रब ने बना दी जोडी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या सिनेमात तिच्या अपोझिट शाहरुख खान होता. सिनेमा सुपरहिट ठरला आणि अनुष्काच्या करिअरचा आलेख उंचावला.

चर्चेत आहे लव्हलाइफ...
बॉलिवूडमध्ये आल्यानंतर अनुष्काचे नाव 'बँड बाजा बारात' सिनेमातीन को-स्टार रणवीर सिंहसोबत जुळले. परंतु काही काळातच दोघे वेगळे झाले. सध्या अनुष्का टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहलीला डेट करतेय. मात्र, अलीकडेच दोघांमध्ये वाद झाला होता. परंतु या चर्चा सुरु असतानाच दोघे पुन्हा एकदा सोबत दिसले आणि दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम लागला.

टॉप अॅक्ट्रेसेसमध्ये सामील...
आज अनुष्का बॉलिवूडच्या मोस्ट डिमांडिंग अॅक्ट्रेसेसपैकी एक आहे. तिने 'बँड बाजा बारात', 'जब तक है जान' आणि 'पीके'सारख्या हिट सिनेमांत काम केले आहे. 'एनएच10' सिनेमातून तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनुष्काचे बालपणीचे निवडक PHOTOS...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...