आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: 3 बर्गर एकाचवेळी खायचा अर्जुन, सिनेसृष्टीत येण्यासाठी कमी केले 65 KG वजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 2012 मध्ये 'इश्कजादे' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री घेणारा अभिनेता अर्जुन कपूर आज आपला 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्जुन निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा आहे. 26 जून 1985 रोजी मुंबईत मोना आणि बोनी कूपर यांच्या घरी अर्जुनचा जन्म झाला. फिल्मी दुनियेत पदार्पण करणा-या अर्जुनचा '2 स्टेट्स' हा मागील सिनेमासुद्धा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या सिनेमा 100 कोटींपेक्षा जास्तचा व्यवसाय केला. याशिवाय रणवीर सिंहसोबत आलेला 'गुंडे' हा सिनेमासुद्धा सुपरहिट ठरला.
आपल्या अभिनयाच्या बळावर इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करणारा अर्जुन एकेकाळी मात्र येथे काम करण्याच्या परिस्थितीत नव्हता. याचे कारण होते त्याचे वाढलेले वजन. आपल्या आकर्षक लूकने तरुणींना भूरळ घालणा-या अर्जुनचे वजन एकेकाळी तब्बल 140 किलो इतके होते. फिल्मी दुनियेत पदार्पण करण्यासाठी अर्जुनने जवळपास 65 किलो वजन कमी केले. यावरुन अर्जुनने वजन कमी करण्यासाठी किती घाम गाळला असेल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकाल.
कसे कमी केले वजन?
अर्जुनने जवळजवळ 65 किलो वजन कमी केले. एका मुलाखतीत अर्जुनने वजन कमी करण्याचे रहस्य उघड केले. अर्जुनने सांगितले, की तो एका महिन्यात दहा किलो वजन कमी करायचा. याकाळात वजन कमी जास्त होत होते. वजन कमी करण्यासाठी अर्जुनने क्रॉस फिट एक्सरसाईज सुरु केली. हा व्यायाम 20 मिनिटांचा असतो. अभिनेता हृतिक रोशनसुद्धा हा व्यायाम करणे पसंत करतो.
एकावेळेला तीन बर्गर खायचा अर्जुन-
एकेकाळी अर्जुन तीन बर्गर एकत्र खायचा. मात्र आता त्याने आपल्या डाएटवर विशेष लक्ष केंद्रित केलेल असून जंक फूड खाणे बंद केले आहे.
दिवसाची सुरुवात-
अर्जुनच्या दिवसाची सुरुवात टोस्ट, 4 ते 6 अंडीनी होते. वर्कआउटनंतर प्रोटिन शेक पिणे तो पसंत करतो.
लंच
पोळी, भाजी, डाळ आणि चिकन. बाजरीची भाकर त्याला विशेष आवडते. कारण यामध्ये फायबर तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पोट लवकर भरतं.
डिनर
प्रोटीनयुक्त जेवण घेणे पसंत आहे. जसे मासे आणि चिकन. गोड खाणे अर्जुन सहसा टाळतो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, लठ्ठ अर्जुनला पुढील स्लाईड्समध्ये...