आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPCL: 41 वर्षांची झाली करिश्मा, पाहा बालपणीपासून ते आत्तापर्यंतचे PIX

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वडील रणधीर कपूर, आई बबिता आणि बहीण करीनासोबत करिश्मा कपूर)
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आज (25 जून) 41 वर्षांची झाली आहे. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. बॉलिवूडचे शो मॅन राजकपूर यांची ती नात आहे. तिचे वडील रणधीर कपूर आणि आई बबिता यांनीसुध्दा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बरेच नाव कमावले आहे. करिश्माला तिचे मित्र-मैत्रीणी आणि कुटुंबीय प्रेमाने 'लोलो' नावाने हाक मारतात.
वयाच्या 17 व्या वर्षी केले डेब्यू
करिश्माने वयाच्या 17व्या वर्षी बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली. 1991मध्ये दिग्दर्शक के. मुरलीमोहन राव यांच्या 'प्रेम कैदी'मधून तिने बॉलिवूड करिअरला सुरूवात केली. 1996च्या 'राजा हिंदुस्तानी' या सुपरहिट सिनेमासाठी तिला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
लग्न, दोन मुले आणि घटस्फोट
90च्या दशकात 'जिगर', 'राजा बाबू', 'सुहाग', 'कुली नं. 1', 'गोपी किशन', 'साजन चले ससुराल', 'जीत'सारखे अनेक सुपरस्टार सिनेमे करिश्माने बॉलिवूडला दिले. त्यानंतर तिने 2003मध्ये उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले. मुलगी समायरा आणि मुलगा कियान ही दोन मुले त्यांना आहेत. 2014 मध्ये करिश्मा आणि संजय यांनी घटस्फोट घेतला.
कमबॅक ठरले फ्लॉप
दीर्घकाळ अभिनय क्षेत्रापासून दूर राहिलेल्या करिश्माने 2012मध्ये 'डेंजरस इश्क' सिनेमातून पुनरागमन केले. मात्र या सिनेमातून तिच्या पदरी अपयश पडले. सध्या ती विविध मॉडेलिंगच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.
करिश्माच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तिची बालपणीपासून ते आत्तापर्यंतची निवडक छायाचित्रे दाखवत आहोत...