(गुगलच्या डूडलवर नर्गिस दत्त)
मुंबईः मोठ्या पडद्यावर आपल्या अदांनी लाखो लोकांचे मन जिंकणा-या नर्गिस दत्त यांची आज 86 वी जयंती आहे. 1 जून 1929 रोजी कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला होता. हेच औचित्य साधून गुगलने डूडलद्वारे नर्गिस दत्त यांना आदरांजली दिली आहे. बॉलिवूडची पहिली ‘क्वीन’ म्हणून नर्गिस दत्त यांना ओळखले जाते.
एक नजर टाकुया एका सामान्य तरुणीपासून ते हिरोईन बनण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासावर...
'मी सुरुवातीलाच निश्चय केला होता, की लग्न केल्यानंतर सिनेमांमध्ये काम करणे सोडून देईन. कारण फिल्मी आणि खासगी आयुष्य आपण एकत्र जगू शकत नाही'- अभिनेत्री नर्गिस