आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तसोबत होते माधुरीचे अफेअर मात्र होऊ शकले नव्हते लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - माधुरी दीक्षित, उजवीकडे वर पती डॉ.श्रीराम नेने, दोन्ही मुले अरिन आणि रेयानसोबत माधुरी दीक्षित)
मुंबईः हिंदी सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्री आहेत. मात्र जे स्थान माधुरी दीक्षितने प्राप्त केले आहे, ते येथे प्रत्येकीलाच प्राप्त करता येते, असे नाही. बॉलिवूडमध्ये 'धक-धक गर्ल' या नावाने प्रसिद्ध असलेल्या माधुरीचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबईत झाला. 80 आणि 90 च्या दशकात बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री राहिलेल्या माधुरीने 1984 मध्ये रिलीज झालेल्या अबोध या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरचा श्रीगणेशा केला.
अनेक सिनेमांमध्ये केला अविस्मरणीय अभिनय
माधुरी दीक्षितने ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘परिंदा’, ‘दिल’, ‘साजन’, ‘बेटा’, ‘खलनायक’, ‘हम आपके हैं कौन..!’, ‘दिल तो पागल है’, ‘मृत्युदंड’ आणि ‘देवदास’सह अनेक सिनेमांमध्ये
आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली.
15 मे रोजी माधुरी दीक्षितचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने Divyamarathi.com तुम्हाला तिच्याशी निगडीत खास गोष्टी सांगत आहे.
संजय दत्तसोबत होते अफेअर
साजन या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान माधुरीचे अभिनेता संजय दत्तसोबत सूत जुळले होते. मात्र त्यानंतर संजय दत्तला टाडा प्रकरणी अटक झाली आणि माधुरीने त्याच्या आयुष्यातून कायमचा काढता पाय घेतला. या दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले. 17 ऑक्टोबर 1999 रोजी माधुरीने डॉ. श्रीराम नेनेंसोबत लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुले असून अरिन आणि रेयान ही त्यांची नावे आहेत. अरिनचा जन्म 2003 मध्ये तर रेयानचा जन्म 2005 मध्ये झाला.
'तेजाब'द्वारे चाखली यशाची चव
माधुरीने 80च्या दशकात आपल्या करिअरला सुरुवात केली. मात्र तिला खरे यश मिळायला आठ वर्षांचा कालावधी लागला. तेजाब हा तिच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा आहे. या सिनेमानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.
'director's actress' आहे माधुरी
माधुरी दीक्षितला 'director's actress' असे म्हटले जाते. एकदा दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी सांगितले होते, "एका दिग्दर्शकाचा करिअर ग्राफ तोपर्यंत अपूर्ण राहतो, जोपर्यंत त्याला माधुरीसोबत काम करण्याची संधी मिळत नाही." 2001 मध्ये फोर्ब्स या अमेरिकन बिझनेस मॅगझिनने माधुरीच्या नावाचा समावेश ‘Top Five Most Powerful Indian Movie Stars’च्या यादीत केला होता.
'देवदास'साठी माधुरीने परिधान केले होते जड आउटफिट
माधुरीने 'देवदास' या सिनेमातील काहे 'छेड छेड मोहे' या गाण्यासाठी तब्ब्ल 30 किलो वजनाचा लहेंगा परिधान केला होता. एवढा जड पोशाख परिधान केल्याने या डान्सच्या कोरिओग्राफीमध्ये ब-याच अडचणी आल्या होत्या. मात्र तरीदेखील माधुरीने हे गाणे पूर्ण केले होते.
कथ्थक नृत्यात आहे पारंगत
माधुरीने वयाच्या तिस-या वर्षीपासून नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. कथ्थक नृत्यात ती पारंगत असून ती ट्रेंड प्रोफेशनल कथ्थक डान्सर आहे.
Microbiologist होण्याची होती इच्छा
माधुरी दीक्षितला मायक्रोबायोलॉजिस्टिक होण्याची इच्छा होती. मात्र नशीबाने ती बॉलिवूडमध्ये आली आणि एक यशस्वी अभिनेत्री ठरली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा माधुरी दीक्षितची कुटुंबीयांसोबतची खास छायाचित्रे...