आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 42 वर्षांच्या सोनू निगमचे फॅमिली मेंबर्ससोबतचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[बहिणी निकिता (डावीकडे) आणि तीशा निगमसह सोनू]
मुंबई - प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगमने आज वयाची 42 वर्षे पूर्ण केली आहेत. 30 जुलै 1973 रोजी फरीदाबाद, हरियाणा येथे त्याचा जन्म झाला. आज सोनूला वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. सोनूने आपल्या सिंगिंग करिअरची सुरुवात वयाच्या चौथ्या वर्षापासून केल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. एका स्टेज शोवेळी सोनूने त्याचे वडील अगम कुमार निगम यांच्यासह मोहम्मद रफी यांचे 'क्या हुआ तेरा वादा' हे प्रसिद्ध गाणे गायले होते. त्यानंतर वडिलांसह तो अनेक लग्न आणि पार्ट्यांमध्ये गाताना दिसला होता.
सोनू निगमचे कुटुंब...
सोनू निगमची आई शोभा यांचे फेब्रुवारी 2013 मध्ये निधन झाले. त्याला दोन बहिणी आहेत. निकिता आणि तीशा ही त्यांची नावे आहेत. सोनूच्या दोन्ही बहिणी पार्श्वगायिका म्हणून करिअर करत आहेत. 'सिंह साहब दी ग्रेट' (2013) या सिनेमातील शीर्षक गीत तीशा निगमने गायले होते. या सिनेमाद्वारे तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. तर निकिताने 2006मध्ये 'प्यारे मोहन' या सिनेमात आपल्या करिअरमधील पहिले गाणे गायले होते. या गाण्याचे बोल होते, 'रब्बा दे दे जवानी'. या गाण्यात तिच्यासह सुनिधी चौहानेसुद्धा स्वरसाज चढवला होता.
सोनूच्या पत्नीचे नाव मधुरिमा असून 2002 मध्ये या दोघांचे लग्न झाले. या दाम्पत्याला एक मुलगा असून त्याचे नाव नवीन आहे. 2011 मध्ये धनुषने गायलेले 'व्हाय धीस कोलावरी डी' या गाण्याच्या चाइल्ड व्हर्जन नवीनने गायले होते.
खासगी माहिती...
वयाच्या 19 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये सिंगिंग करिअर सुरु करण्याच्या उद्देशाने सोनू मुंबईत आला. सुरुवातीच्या काळात सोनूने मोहम्मद रफी यांची गाणी गायली. त्यामुळे त्याला 'रफी क्लोन' या नावाने ओळखले जाऊ लागले होते. 1997 मध्ये 'परदेस' या सिनेमातील 'ये दिल दीवाना' हे गाणे गायल्यानंतर लोकांचे त्याच्याविषयीचे मत बदलले.
1990 मध्ये 'जानम' या सिनेमातीसाठी सोनूने पहिल्यांदा पार्श्वगायन केले होते, मात्र ते गाणे रिलीज होऊ शकले नाही. 1995 मध्ये त्याने 'सारेगामा' हा सांगितिक रिअॅलिटी शो होस्ट केला. हा शो टीव्ही जगतातील प्रसिद्ध शोपैकी एक आहे. याचवर्षी त्याने 'बेवफा सनम' या सिनेमातील 'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का' हे गाणे गायले. त्याकाळी हे गाणे बरेच गाजले होते.
त्यानंतर 1997मध्ये 'बॉर्डर' सिनेमातील 'संदेसे आते है' या गाण्याने सोनूला बरीच प्रसिद्ध मिळवून दिली. हे गाणे अनू मलिक यांनी कंपोज केले होते. सोनून त्याच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत अनेक गाणी गायली. याशिवाय 'दीवाना'(1999), 'याद' (2001), 'जान'(2000) आणि 'चंदा की डोली' (2005) हे अल्बमसुद्धा तयार केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सोनू निगमची त्याच्या कुटुंबीयांसोबतची खास छायाचित्रे...