आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा सुमधूर आवाजाने भूरळ घालणा-या आशा भोसले यांचे कधीही न पाहिलेले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः सुमधूर आवाजाने लोकांना भूरळ घालणा-या आशा भोसले यांचा आज 83 वा वाढदिवस साजरा करत आहे. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली, महाराष्ट्र येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दीनानाथ मंगेशकर होते. ते मराठी रंगमंचाशी जोडलेले होते. आतापर्यंत आशा यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी 12 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. हिंदीशिवाय त्यांनी मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रुसी भाषेतसुध्दा अनेक गाणी गायली आहेत. 1943मध्ये त्यांनी 'माझा बाळ' या पहिल्या मराठी सिनेमात गाणे गायले. 'चला चला नव बाळा...' हे गाणे दत्ता डावजेकर यांनी स्वरबध्द केले होते.
1948मध्ये 'चुनरिया' हिंदी सिनेमातील 'सावन आया' हे गाणे त्यांनी हंसराज बहल यांच्यासाठी गायले होते. 1957मध्ये संगीतकार ओपी नैय्यर यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये बनलेला निर्माता-दिग्दर्शक बीआर चोप्रा यांचा 'नया दौर' त्यांच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. 1966मध्ये 'तिसरी मंजिल'मध्ये आरडी बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली 'आजा आजा मै हू प्यार तेरा...' गाण्याला आशा यांनी आवाज दिला. या गाण्याने त्यांना बरीच लोकप्रियता मिळाली.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सुमधूर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणा-या आशा भोसले यांची जुनी छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...